Breaking

सोमवार, ८ फेब्रुवारी, २०२१

माढा तालुक्यातील 82 ग्रामपंचायतीच्या सरपंच उपसरपंच पदाच्या निवडी पुढे ढकलण्यातआल्या.... ........... जिल्हाधिकार्यांचा आदेश


माढा तालुक्यातील 82 ग्रामपंचायतीच्या सरपंच उपसरपंच पदाच्या निवडी पुढे ढकलण्यातआल्या....
                   ........... जिल्हाधिकार्यांचा आदेश

  बेंबळे । प्रतिनिधी

माढा तालुक्यातील 82 ग्रामपंचायतीच्या सरपंच उपसरपंच पदासाठी 9 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या निवडी ,माननीय जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज एका आदेशान्वये पुढे ढकलल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाप्रमाणे पुढील आदेश आल्यानंतरच सरपंच उपसरपंच पदाच्या निवडी होणार हे निश्चित. माढा प्रमाणेच जिल्ह्यातील सांगोला, पंढरपूर, माळशिरस, अक्कलकोट ,मोहोळ,व दक्षिण सोलापूर तालुक्यातील देखील सरपंच उपसरपंच पदाच्या निवडी पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. परंतु करमाळा, बार्शी ,मंगळवेढा आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील सरपंच उपसरपंच पदाच्या निवडी पूर्वी ठरल्याप्रमाणेच  9 ते 11 फेब्रुवारी दरम्यान पार पडतील असेही कळविण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा