Breaking

सोमवार, ८ फेब्रुवारी, २०२१

नवनाथ गायकवाड मराठवाडा मित्रमंडळाच्या वतीने नूतन उपविभागीय पोलिस अधिकारी डॅनियल बेन व पोलीस निरीक्षक गोरख दिवे यांचा सत्कार**




*नवनाथ गायकवाड मराठवाडा मित्रमंडळाच्या वतीने नूतन उपविभागीय पोलिस अधिकारी डॅनियल बेन व पोलीस निरीक्षक गोरख दिवे यांचा सत्कार*

*लातूर जिल्हा प्रतिनिधि /जीवन भोसले* 

*उदगीर*:   उदगीर येथील नेहमीच सामाजिक कार्यात सक्रिय असे नवनाथ गायकवाड मराठवाडा मित्रमंडळाच्या वतीने उपविभागीय पोलिस अधिकारी डॅनियल बेन व पोलीस निरीक्षक गोरख दिवे यांचा सत्कार शाल, पुष्पहार व वृक्ष देऊन मित्र मंडळाचे संस्थापक नवनाथ गायकवाड  यांच्या  हस्ते करण्यात आला. नवनाथ गायकवाड मराठवाडा मित्र मंडळ हे सदैव सामाजिक कार्यात काम करणाऱ्या व्यक्ती, पत्रकार, प्रशासकीय अधिकारी व इतर क्षेत्रातील मान्यवर यांच्या कामाची दखल घेऊन त्यांचे मनोबल वाढवण्याचे सातत्याने काम करत असते. तसेच शहर व तालुक्यातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, अनाथाला व विधवा महिलांना आधार,  कोरोनाच्या महामारी काळात  
लॉकडाऊन असताना या मित्र मंडळाने जीवाची परवा  न करता गरजू लोकांना अन्नधान्य किट वाटप केले व असे अनेक सामाजिक कार्य हे मित्रमंडळ सातत्याने करून समाजाला आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. तसेच सर्व रोग निदान शिबीर, नेत्र रोग तपासणी शिबीर राबवून अशा अनेकांच्या जीवनातील अंधकार दूर करून दृष्टि देण्याचे काम हे मित्र मंडळ करत असते यांचाच एक भाग किंवा आपले कर्तव्य समजून या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.
     यावेळी उदगीर ग्रामीण पोलीस निरीक्षक दीपककुमार वाघमारे,  धनाजी बनसोडे प्रा. मदन पाटील,  दत्तात्रय काळोजी गुरुजी महालिंग स्वामी राजकुमार खंडारे माधव उदगीरकर राहुल सोनवणे युवराज अमृतराव जोमदे इत्यादी मान्यवरांचे सत्कार करण्यात आले, मित्र मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा