Breaking

शनिवार, २७ फेब्रुवारी, २०२१

भुरकवडीच्या सरपंचपदी ललीता कदम, उपसरपंचपदी रंजना कदम*



*भुरकवडीच्या सरपंचपदी ललीता कदम, उपसरपंचपदी रंजना कदम*


वडूज प्रतिनिधी /शरद कदम


     वडूज : भुरकवडी ( ता. खटाव ) ग्रामपंयतीच्या सरपंचपदी ललीता कदम व उपसरपंचपदी रंजना कदम यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणुक निर्णय अधिकारी संजय शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सदस्यांच्या बैठकीत या निवडी करण्यात आल्या. यावेळी ग्रामसेविका धनश्री गंमरे उपस्थित होत्या.
        सात महिला सदस्य संख्या असलेल्या भुरकवडी गावातील सर्वपक्षीय प्रमुखांनी एकत्र येत ग्रामपंचायतीची निवडणूक ही सहाव्यांदा बिनविरोध केली होती. तर शुक्रवार दि.२६ रोजी सरपंच व उपसरपंचपदाच्या निवडीही बिनविरोध करण्यात आल्या.
       सरपंच पदासाठी ललीता छगन कदम व उपसरपंच पदासाठी रंजना मधुकर कदम यांचे दोनच अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहिर करण्यात आले. यावेळी शितल कदम, रेश्मा कदम, मनिषा कदम, सुजाता गाढवे, सुलोचना कुंभार या सदस्या उपस्थित होत्या.
         नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंचांचा सत्कार करण्यात आला. यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष शिवाजीराव कदम, माजी सरपंच एस.के.कदम, प्रविण कदम, सोसायटी चेअरमन हणमंत कदम, माजी चेअरमन मधुकर कदम, शरद कदम, कैलास जाधव, शिवाजी कदम, छगन कदम, सुखदेव जाधव, अधिक चव्हाण, गणपत कदम, सयाजी कदम, उत्तम कदम आदि सह ग्रामस्थ उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा