Breaking

रविवार, १४ फेब्रुवारी, २०२१

धाराशिव तालुक्यातील ग्रामपंचायतीत शिवसेनाच अव्वल स्थानी*



*धाराशिव तालुक्यातील ग्रामपंचायतीत शिवसेनाच अव्वल स्थानी*
तुळजापूर प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद


धाराशिव जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार ओमप्रकाश(दादा) राजेनिंबाळकर व धाराशिव शिवसेना जिल्हाप्रमुख तथा धाराशिव कळंबचे आमदार कैलास दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव तालुक्यातील 65 पैकी 32
ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकविल्या बद्दल शिवसेना तालुका प्रमुख सतीश कुमार सोमानी यांचा आई तुळजाभवानी मातेची प्रतिमा व पुष्पगुच्छ,देऊन तुळजापूर शिवसेना सोशल मिडीया तालुकाप्रमुख चेतन बंडगर,व सिदफळ सोशल मिडीया विभागप्रमुख सिद्रामप्पा कारभारी याच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसैनिक पप्पू माने, व धाराशिव शिवसेना कार्यालय प्रमुख नितीन भांगे उपस्थित होते.
धाराशिव तालुक्यातील ग्रामपंचायतीवर भगवा फडकवण्यासाठी धाराशिव तालुकाप्रमुख यांनी मोठी मोलाची कामगिरी बजावली ग्रामपंचायत सदस्यांचा फार्म भरण्यापासून ते शेवटपर्यंत प्रचार यंत्रणेत,कसे उतरावे व जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसे पोहचलो पाहिजेत यांचे मार्गदर्शन शेवटपर्यंत धाराशिव शिवसेना तालुकाप्रमुख सतिश कुमार सोमाणी यांनी केली भले मोठे आवाहन शिवसैनिकांच्या साथीने यशस्वी पणे पार पाडले.

प्र

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा