*सोलापूर जिल्ह्यात भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाची आढावा बैठक संपन्न .....*
*टेंभुर्णी प्रतिनिधी AJ 24 Taas News
भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा च्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा सौ.उमाताई खापरे यांच्या अध्यक्षतेखाली व सौ.दिपाली मोकाशी प्रदेश सरचिटणीस, नगरसेविका मुंबई, सौ. रिध्दा रशीद प्रदेश चिटणीस, सौ.मीनाक्षी पाटील प्रभारी सोलापूर, सौ.धनश्री खटके पाटील जिल्हा अध्यक्षा सोलापूर यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक संपन्न झाली.
भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा च्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा सौ उमाताई खापरे यांचा सत्कार सोलापूर जिल्हा अध्यक्षा सौ धनश्री खटके पाटील यांचे हस्ते करण्यात आला.
शक्तीकेंद्र प्रमुख व बुथ प्रमुख नेमणुका करण्याबाबत सौ.उमाताई खापरे यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी सौ.साधना भोसले नगराध्यक्षा पंढरपूर, सौ. अर्चना व्हरगर सभापती पं.स. पंढरपूर, सौ.श्वेता डोंबे उपनगराध्यक्षा पंढरपूर, सौ. राजश्री भोसले नगरसेविका, सौ. रेणुका घोडके पं.स.सदस्या,मा.शंकरराव वाघमारे प्रदेश उपाध्यक्ष किसान मोर्चा, मा. संजय आण्णा क्षीरसागर, सौ.अंजली काटकर मोहोळ तालुका अध्यक्ष,तसेच सर्व तालुका अध्यक्ष, जिल्हा पदाधिकारी, उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा