सोलंकरवाडी ग्रामपंचायतच्या सरपंचपदी अनंता गलांडे यांची बिनविरोध निवड तर उपसरपंचपदी शकुंतला शेंडगे
मोडनिंब प्रतिनिधी रत्नदीप पवार
AJ 24 Taas News Maharashtra
माढा तालुक्यातील सोलंकरवाडी ग्रामपंचायतच्या सरपंचपदी जय हनुमान ग्रामविकास आघाडीचे अनंता गलांडे तर उपसरपंचपदी शकुंतला शेंडगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जोशी यांनी तर सहाय्यक म्हणून राजकुमार मोरे व मनोहर मोहिते यांनी काम पाहिले यावेळी ग्रामपंचायतचे सात पैकी अनंता गलांडे,सौ.शकुंतला शेंडगे, बाबासाहेब पांढरे,सौ.उषा खरात,सौ.शीतल शेंडगे,सौ वंदना मोरे हे सहा सदस्य उपस्थित होते. यावेळी राजाभाऊ भांगिरे यांनी पुढील काळात गावचा विकास सभापती विक्रमसिंह शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करणार असून गावच्या विकासासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले तर सरपंच अनंता गलांडे यांनी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. यावेळी माजी सरपंच बाबासाहेब माळी,ग्रामीण विकास संस्थेचे अध्यक्ष विक्रम भांगिरे,गोपाळ माळी यांनी मनोगत व्यक्त केले.
या वेळी विक्रमसिंह शिंदे बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष धनाजी धायगुडे,गणेश माळी,बापू धायगुडे,उद्धव राजगे साहेब,राजकुमार पाटील,संभाजी पाटील,माजी सरपंच दत्तात्रय धायगुडे,रमेश शेंडगे,माजी उपसरपंच दिगंबर खरात,ज्ञानदेव शेंडगे,अनिल शेंडगे,दशरथ पांढरे,साहेबराव भांगिरे,दशरथ शेंडगे बालाजी चव्हाण,नाना व्हरकुटे,मारुती कांबळे,विठ्ठल झाडकर,मधुकर गलांडे,उत्तम शेंडगे,भागवत गलांडे,मारुती धायगुडे,महादेव शेंडगे,दत्ता गाडे,भागवत धायगुडे,धनाजी राजगे,आबा मोटे,शिवाजी गलांडे,आप्पा पांढरे,अंकुश भांगिरे, रघुनाथ राऊत,राजाराम गलांडे,वामन यादव,मोहन गलांडे,आण्णा पांढरे,अशोक शेंडगे,शिवाजी पांढरे,मोहन भांगिरे,आंबदास गलांडे,गणेश मारकड,वैजिनाथ राजगे,सोमनाथ सोलंकर,शिवाजी व्हरकुटे,रविकांत शेंडगे,राजेंद्र वाघमोडे,संतोष सोलंकर,संतोष भांगिरे,उमेश मोरे,नागनाथ सलगर,प्रताप राजगे,देविदास खरात,बाळासाहेब मदने,नागनाथ राजगे,तानाजी सलगर,बाळासाहेब माळी,दादा राजगे व ग्रामस्थ उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संतोष गलांडे, नवनाथ गलांडे,हनुमंत गलांडे,संदीप गलांडे,हनुमंत भांगिरे,शुभम गलांडे,दिपक कांबळे योगेश गलांडे, सोमनाथ शेंडगे शाहजी शेंडगे, यांनी परिश्रम घेतले. राष्ट्र संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करून तसेच गावातील जेष्ठ नागरिक वसंत शेंडगे यांचे निधन झाल्याने त्यांना श्रद्धांजली अर्पण करून फटाके व गुलाल न उधळता कोणतीही मिरवणूक न काढता शांततेत निवड पार पाडली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा