Breaking

बुधवार, २४ फेब्रुवारी, २०२१

तांबवे टें ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सचिन कांबळे तर उपसरपंचपदी सुरेखा खटके



तांबवे टें ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सचिन कांबळे तर उपसरपंचपदी सुरेखा  खटके 



तांबवे (प्रतिनिधी) महेश देशमुख
AJ 24 Taas News Maharashtra

तांबवे टें ता. माढा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत माजी सरपंच राजाभाऊ खटके व तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष नागाभाऊ खटके यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी जय हनुमान ग्रामविकास आघाडीने विजयाची हॅट्ट्रिक करत आपली सत्ता कायम राखली होती. या आघाडीचे ७ तर विरोधी युवकांच्या आघाडीचे २ उमेदवार निवडून आले होते. निवडणूक निर्णय अधिकारी ए. ए. जरांडे, ग्रामसेवक आर. एस. माळी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी पी.एल.काळे यांच्या उपस्थितीत झालेल्या सरपंच, उपसरपंच पदाच्या निवडणुकीत प्रत्येकी एक-एक अर्ज दाखल झाल्याने सरपंचपदी सचिन बाळासाहेब कांबळे तर उपसरपंचपदी सुरेखा महारूद्र खटके यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी नुतन ग्रामपंचायत सदस्य धनश्री राजाभाऊ खटके, निकिता नागेश खटके, विमल अनिल पाटील, जयश्री नवनाथ जाधव, रेश्मा समीर तांबोळी उपस्थित होते. 




निवडीनंतर तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष नागनाथ खटके,माजी सरपंच राजाभाऊ खटके, माजी चेअरमन संतोष खटके, नागेश  खटके, सोसायटीचे नुतन अशोक खटके, सुभाष खटके,माजी चेअरमन भजनदास खटके, महारुद्र  खटके, पोलीस पाटील जयसिंग पाटील, मधुकर खटके यांनी नुतन सरपंच व उपसरपंचाचा सत्कार केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा