वरवडे सरपंचपदी महाविकास आघाडीचे आबासाहेब घाडगे बिनविरोध...
फोटो
बेंबळे प्रतिनिधी/सज्जन शिंदे
बेंबळे प्रतिनिधी:- माढा तालुक्यातील वरवडे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी दादा-मामा पुरस्कृत वरवडे महाविकास आघाडीचे आबासाहेब घाडगे तर उपसरपंच पदी सिद्धेश्वर भोसले यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
वरवडे ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुक २०२१ मध्ये ९ जागेसाठी झालेल्या निवडणूकीमध्ये वरवडे महाविकास आघाडीने ९ पैकी ०७ उमेदवार आघाडीप्रमुख हनुमंत तात्या घाडगे, ॲड बाळासाहेब पाटील, भारत गायकवाड, दीपक घाडगे, राजाभाऊ गायकवाड, प्रताप घाडगे यांच्या नेतृत्वाखाली निवडून आले आहेत. वरवडे ग्रामपंचायतीत सरपंचपद सर्वसाधरणसाठी आरक्षित असल्याने वरवडे महाविकास आघाडीच्या प्रमुखांनी सर्वानुमते सर्वसाधारण ४ सदस्यांपैकी आबासाहेब घाडगे यांची सरपंचपदी तर सिद्धेश्वर भोसले यांची उपसरपंचपदासाठी अर्ज दाखल केल्यामुळे सरपंच व उपसरपंचपदाची निवड बिनविरोध जाहीर करण्यात आली. यावेळी वरवडे महाविकास आघाडीचे नूतन सदस्य नागनाथ पाटील, रविकांत मेनकुदळे, सिंधू पाटील, सुरेखा कसबे, रेखा पखाले, राजाबाई गायकवाड उपस्थित होते.
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बागल, तलाठी बोराटे व ग्रामसेवक मोहिते यांनी काम केले. सदरप्रसंगी वरवडे महा विकास आघाडीचे शिवाजी गायकवाड, गणेश गायकवाड, सुनील गायकवाड, महादेव घाडगे, नवनाथ घाडगे, प्रदीप वजाळे, महावीर बनसोडे, रमेश पाटील, अनिल गायकवाड, नागनाथ गायकवाड आदींसह कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
आबासाहेब घाडगे व सिध्देश्वर भोसले यांची निवड बिनविरोध होताच गावातून फटाक्याची आतिशबाजी व गुलालाची मुक्त उधळण करण्यात आली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा