नूतन सरपंचांनी गावाच्या विकासासाठी विविध योजना राबविल्या तर गावचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही-- कल्याण पाटील*
( महेश बिरादार मित्रपरिवारातर्फे हेर व परिसरातील नूतन सरपंच, उपसरपंच,सदस्य यांचा नागरी सत्कार तसेच कृष्णा घोगरे यांचा अभिष्टचिंतन सोहळा व सिद्धेश्वर लांडगे यांचे व्याख्यान संपन्न.)
*लातूर जिल्हा प्रतिनिधि /जीवन भोसले*
लातूर (ता. उगदीर) दि. १७/०२/२०२१ रोजी मौजे हेर येथे महेश बिरादार मित्रपरिवार आयोजित कार्यक्रमात हेर, करडखेल, भाकसखेडा, चिघळी,गंगापूर,करवंदी,कुमठा ( खु ), हांगरगा, एकूर्का रोड, होणी हिप्परगा,क्षेत्रफळ, अरसनाळ, करखेली, कुमदाळ हेर, हाळी या गावातील सर्व सन्माननीय नवनियुक्त सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा नागरी सत्कार अगदी जोमात पार पडला.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पंचायत समितीचे माजी सभापती श्री सोपानराव ढगे साहेब तर प्रमुख पाहुणे म्हणून उदगीर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा मा. जि.प.सभापती श्री कल्याणजी पाटील साहेब, पणन महासंघाचे संचालक श्री भरतभाऊ चामले साहेब,राष्ट्रवादी काँग्रेस VJNT सेल चे प्रदेश सरचिटणीस श्री प्रकाशराव राठोड साहेब,श्री पंडित नाना ढगे,श्री बळवंत घोगरे,श्री बेंबडे मामा व गावातील व परिसरातील नागरिक उपस्थित होते.
नूतन सरपंचांनी गावाच्या विकासासाठी विविध योजना राबविल्या तर गावचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही असे मत यावेळी कल्याण पाटील यांनी व्यक्त केले.तर महेश बिरादार यांनी तालुका आणि जिल्हास्तरावरील वरिष्ठांच्या मार्गदर्शनात परिसरातील नागरिकांची सेवा करण्याची संधी मित्रपरिवार कुठेच सोडणार नाही असा विश्वास व्यक्त केला.
यानंतर व्याख्यान झाल्यानंतर कृष्णा घोगरे यांचा भव्य अभिष्टचिंतन सोहळा पार पडला व कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा