Breaking

गुरुवार, ४ फेब्रुवारी, २०२१

मानव सुरक्षा संघ जिल्हाध्यक्ष पदी सुहास घोलप यांची निवड*



*मानव सुरक्षा संघ जिल्हाध्यक्ष पदी सुहास घोलप यांची निवड*
 *करमाळा तालुका प्रतिनिधी-अतुल वारे पाटील*

मानव सुरक्षा सेवा संघ ( ह्यूमन प्रोटेक्शन सर्विस असोसिएशन इंडिया ) या संघटनेच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी करमाळा येथील करमाळा पत्रकार संघाचे अध्यक्ष  सुहास घोलप यांची  एकमताने निवड झाली आहे.
          सदर निवड मानव सुरक्षा सेवा संघाचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष दिलीप कंखर व राष्ट्रीय संस्थापक उपाध्यक्ष गणेश रंगराव डवरी तसेच  संस्थापक महासचिव गजानन इंगळे ,राष्ट्रीय सचिव  गजेंद्र भिसे, राष्ट्रीय संस्थापक कोषाध्यक्ष चंद्रकांत अभिमान जाधव,राष्ट्रीय प्रमुख अरुण पांडव, राष्ट्रीय सदस्य ऍड राजू कासार, राष्ट्रीय सदस्य संतोष चिलवंते,प्रदेशाध्यक्ष डॉ.दिलीप शेटे , यांच्या मार्गदर्शनाने अतिशय उत्कृष्टपणे सामाजिक काम , निस्वार्थ सेवा, गोरगरीब लोकांसाठी तळमळ व सामाजिक कार्याची दखल घेऊन आदर युक्तपणे सर्वानुमते करण्यात आलीअसल्याचे सुहास घोलप यांनी निवडीनंतर बोलताना सांगितले. निवड झाल्या नंतर करमाळा शहर व परिसरातील नागरिकांनी त्यांचे अभिनंदन केले व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा