Breaking

गुरुवार, ४ फेब्रुवारी, २०२१

मराठा आरक्षण स्थगितीपूर्वी नियुक्ती उमेदवारांना सेवेत घ्यावे -अंकिता पाटील*



*मराठा आरक्षण स्थगितीपूर्वी नियुक्ती उमेदवारांना सेवेत घ्यावे -अंकिता पाटील* 

इंदापूर प्रतिनिधी शिवाजी पवार

   मराठा आरक्षणाला स्थगिती मिळण्यापूर्वी निवड प्रक्रिया पूर्ण झालेल्या मुंबई-मेट्रो, तलाठी, महावितरण, महानिर्मिती, स्टेट बोर्ड महाराष्ट्र सेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या विविध विभागातील निवड झालेल्या उमेदवारांना तात्काळ शासकीय सेवेमध्ये घ्यावे याकरिता मुंबई येथील आझाद मैदान येथे मराठा समाज व विद्यार्थ्यांच्या वतीने गेल्या पंधरा दिवसांपासून मोठे जन आंदोलन चालू आहे. 
   आज या आंदोलनाला पुणे जिल्हा परिषद सदस्या व इसमा कायदेशीर समितीच्या सह अध्यक्षा कु अंकिता हर्षवर्धनजी पाटील यांनी भेट दिली व विद्यार्थ्यांच्या समस्या व मागण्या जाणून घेतल्या व  या आंदोलनाला व विद्यार्थ्यांना जाहीर पाठिंबा दिला.

   यावेळी कु.अंकिता पाटील म्हणाल्या की, हे विद्यार्थी लोकशाही मार्गाने आंदोलन करत आहेत. माझी सरकारला एक नम्रपूर्वक विनंती आहे की या विद्यार्थ्यांच्या सर्व समस्या आपण सोडवाव्यात व तात्काळ या विद्यार्थ्यांना न्याय देऊन शासकीय सेवेत रुजू करून घ्यावे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा