Breaking

सोमवार, १५ फेब्रुवारी, २०२१

सिडकोत शिवजन्मोत्सवानिमीत्तच्या सामान्यज्ञान स्पर्धेस प्रतिसाद


सिडकोत शिवजन्मोत्सवानिमीत्तच्या सामान्यज्ञान स्पर्धेस प्रतिसाद

नांदेड जिल्हा प्रतिनिधी
बालाजी सिरसाट

       सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती,मराठा सेवा संघ,संभाजी ब्रिगेड,जिजाऊ ब्रिगेड,डाॅ.पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परीषद सिडकोच्यावतीने जिजाऊ सृष्टी सिडको येथे शिवजन्मोत्सवानिमीत्त घेण्यात आलेल्या सामान्यज्ञान स्पर्धेस उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.
       दरवर्षी प्रमाणे याही वर्षी शिवजन्मोत्सवानिमीत्त जिजाऊ सृष्टी सिडको येथे सामान्यज्ञान स्पर्धा रविवार दिनांक १४ फेब्रुवारी रोजी झाली. सदरील स्पर्धा ५ वी ते ७ वी चा प्राथमिक गट,८ वी ते १० वी चा माध्यमीक गटातुन घेण्यात आली.स्पर्धेचे बक्षीस दिनांक २१ फेब्रुवारी रोजी होणार्या जिजाऊ सृष्टी येथील कार्यक्रमात देण्यात येणार आहे.
      ही स्पर्धा घेण्यासाठी मराठा सेवा संघाचे मार्गदर्शक सोपान पांडे,साहेबराव गाढे,शिवजन्मोत्सवाचे स्वागताध्यक्ष बापुसाहेब पाटील,सचिव दिगंबर शिंदे,मराठा सेवा संघ सिडको अध्यक्ष ञ्यंबक कदम,जयवंत काळे,संभाजी ब्रिगेड लोकसभा अध्यक्ष संकेत पाटील,सुभाष सुर्यवंशी,आनंदा कदम,रोहीदास कवाळे,दिपक भरकड,मधुकर गायकवाड,संदीप मोरे,बी.एम.हिवराळे,दिलीप कदम,डी.के.शिंदे,विठ्ठल आढाव यांनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा