*बीड जिल्ह्याच्या विकासासाठी प्रारूप आराखड्यात 97.17 कोटी*
गेवराई तालुका प्रतिनिधी- नवनाथ आडे-9075913114
जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेंतर्गत बीड जिल्ह्यासाठी २४२ कोटी रुपये नियतव्ययाची मर्यादा नियोजन विभागाने ठरवून दिली होती. परंतु त्यामध्ये आज झालेल्या बैठकीत 97.17 कोटी रुपयांनी वाढ करून सर्वसाधारण योजनेसाठी बीड जिल्ह्याच्या विकासासाठी 340 कोटी मंजूर करण्यात आले. अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चालू वर्षाच्या खर्चाचा आढावा घेतल्यानंतर पुढील वर्षाच्या जिल्हा नियोजन प्रारुप आराखड्यास मंजूरी दिली.बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे व अन्य सर्वच लोकप्रतिनिधींनी केलेल्या मागणीनुसार वाढीव निधी दिल्याचे ना. अजितदादा पवार म्हणाले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा