Breaking

रविवार, २१ फेब्रुवारी, २०२१

जातेगाव येथे जिजाऊ ज्ञान मंदिर व ग्रामस्थांकडून शिवजन्मोत्सव साजरा*

जातेगाव येथे जिजाऊ ज्ञान मंदिर व ग्रामस्थांकडून शिवजन्मोत्सव साजरा*
*करमाळा तालुका प्रतिनिधी - अतुल वारे पाटील*
 जातेगाव ता करमाळा येथे जिजाऊ ज्ञान मंदीर तसेच ग्रामस्थ यांच्याकडून उत्साहात शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला.
    जिजाऊ ज्ञान मंदिर इंग्लिश स्कूल येथे सरपंच छगन ससाणे , जेष्ठ नेते शिवाजी माने, बाळासाहेब वारे पाटील, शाळेचे अध्यक्ष अतुल वारे पाटील,उपाध्यक्ष युवराज वारे पाटील,संचालिका ज्योती वारे पाटील,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका उपाध्यक्ष तानाजीराजे शिंदे,मराठा सेवा संघ तालुका सचिव सचिन शिंदे, जिजाऊ ब्रिगेडच्या तृप्तीताई शिंदे आदींच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती शिवरायांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सरपंच छगन ससाणे यांच्या हस्ते भगव्या ध्वजाचे अनावरण करण्यात आले.यावेळी शिक्षक, विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
    जातेगाव येथे मध्यवर्ती शिवजन्मोत्सव समिती व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत छत्रपती चौक येथे छत्रपती शिवरायांच्या मूर्तीचे विधिवत पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सरपंच ,उपसरपंच अच्युत कामटे ,माजी सैनिक प्रकाश पाटील,सदस्य प्रमोद वारे,महेंद्र वारे, बाबासाहेब शिंदे,रमेश पाटील,दिलीप काकडे,तुकाराम पवार,मराठा सेवा संघ तालुकाध्यक्ष अतुल वारे पाटील, सचिव सचिन शिंदे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते दीपक शिंदे, तालुका उपाध्यक्ष तानाजीराजे शिंदे, तुषार शिंदे,कल्याण शिंदे ,गणेश वाघमोडे, राहुल शिंदे , गणेश  कामटे,गणेश वाघमाडे ,विशाल शिंदे तसेच युवा वर्ग,ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा