Breaking

शनिवार, २० फेब्रुवारी, २०२१

छत्रपती शिवराय हे जागतिक कीर्तीचे राजे - शिवव्याख्याते इंजि. प्रविण जाधव पाटील

छत्रपती शिवराय हे जागतिक कीर्तीचे राजे - शिवव्याख्याते इंजि. प्रविण जाधव पाटील*


नांदेड जिल्हा प्रतिनिधी/बालाजी सिरसाट

मौजे.पळसवाडी येथे कुळवाडी भूषण बहुजनप्रतिपालक रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९१ व्या जन्मोत्सव सोहळ्या निमित्त आयोजित व्याख्यनमालेत प्रविण जाधव बोलत होते.
गेल्या अनेक वर्षापासून आपण शिवराय हे महाराष्ट्राचे राजे होते हे एकत आलेलो आहोत. पण छ्त्रपती शिवराय हे अखंड भारताचे राजे होते हे आपण आत्तातरी समजून घ्यायला हवं.
        पुढे बोलताना जाधव म्हणाले शिवरायांचे विचार आचरणात आणून मुलांनी आत्ता तलवारीच्या एवजी लेखणी उचलली पाहिजे आणि इथली व्यवस्था पालथी घातली पाहिजे.
आणि जाती धर्माच्या राजकारणापासून दूर राहून बळीराजा ते शिवराय यांनी दिलेला मानवतावाद पुढे आपण पण चालवला पाहिजे.

 महिलांनी राष्ट्रमाता जिजाऊ साहेबाचे विचार घेऊन अंधश्रद्धा कर्मकांड यातून बाहेर पडून मुलींच्या शिक्षणासाठी प्रयत्न केले पाहिजे
चिकिस्तक बुध्दी वापरून खर काय खोटं काय याचा निवाडा महिलेने करायचा आहे. हीच खरी शिवरायांना आदरांजली ठरेल
या कार्यक्रमासाठी उपस्थित विचारमंच  वर बजरंग पाटील पाळेकर. राजू पाटील वसुरकर,आनंद कदम शंकतिर्थ,शिवाजी बामणे पाटिल व गावातील व परिसरातील नागरिक,महिला उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा.संतोष तळेगावे सर यांनी केले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा