Breaking

शुक्रवार, १२ फेब्रुवारी, २०२१

आगामी काळातील निवडणुकात भाजपा वर्चस्व प्रस्थापित करणार - गणेश चिवटे



*आगामी काळातील निवडणुकात भाजपा वर्चस्व प्रस्थापित करणार - गणेश चिवटे*
*करमाळा तालुका प्रतिनिधी- अतुल वारे पाटील*
              नुकत्याच  पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भाजपा ने  करमाळा तालुक्यामध्ये आपली चमक दाखवली असून  पहिल्यांदाच ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये बहुतांश ठिकाणी यश मिळाले आहे. भविष्यात भाजप सर्वच निवडणुकांमध्ये वर्चस्व प्रस्थापित करेल असा विश्वास भाजपचे तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांनी व्यक्त केला.  
      तालुक्यांमध्ये एकूण 41 ग्रामपंचायत सदस्य भाजपाचे निवडून आले ,व त्याची परिणिती काल झालेल्या सरपंच निवडणुकीमध्ये पहावयास मिळाली असून  बिटरगाव श्री व  मिरगव्हाण या ठिकाणी भाजपाचे सरपंच बिनविरोध निवडून आले ,तर पांडे ग्रामपंचायत मध्ये नारायण आबा पाटील व भाजपाने मिळवून सत्ता काबीज केली.
   याकमी  सर्वच जुने नवे कार्यकर्ते व पदाधिकारी खंबीरपणे साथ देत आहेत . कार्यकर्ते व नागरिकांच्या जोरावरच हे घवघवीत यश संपादन करता आले अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
यावेळी विठ्ठलराव भनगे ,जिल्हा सरचिटणीस किरण बोकन ,ॲड भगवान गिरी गोसावी,
रामभाऊ ढाणे , अफसर जाधव ,बाळासाहेब कुंभार, मोहन शिंदे ,सचिन गायकवाड ,धर्मराज नाळे ,विजय नागवडे ,श्याम सिंधी, भैया कुंभार, जयंत काळे पाटील उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा