Breaking

गुरुवार, ११ फेब्रुवारी, २०२१

सनराईज इंग्लिश मीडिअम गुरुकुलच्या विश्वतेज बोबडे याची राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेसाठी निवड*




टेंभूर्णी प्रतिनिधी
श्री माऊली शिक्षण प्रसारक व समाजसेवा मंडळ संचलित सनराईज इंग्लिश मीडिअम (गुरुकुल) या इयत्ता दहावी मधील विश्वतेज नागेश बोबडे याची दिनांक. 20/02/2021 ते 21/02/2021 या कालावधीत अमरावती येथे होणार्‍या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली.
             दिनांक. 10/02/2021 रोजी अरण येथे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निवड स्पर्धेसाठी जिल्ह्यातून जवळ जवळ 150 स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला यामध्ये सबज्युनियर कंपाउंड गटात 50 मीटर अंतरामध्ये 360 पैकी 297 गुण मिळवून अमरावती येथे होणाऱ्या राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेसाठी निवड झाली
 
कोणत्याही यशाचे गमक हे कष्टात आणि सातत्यपूर्ण प्रयत्नात असते. मेहनत करून यश प्राप्त करता येते हे यातून सिद्ध झाले. विद्यार्थ्यांमध्ये खेळाडू वृत्ती रुजविण्यासाठी संस्था नेहमीच प्रोत्साहन देत आलेली आहे. त्याचेच फलित या विद्यार्थ्याच्या राज्यस्तरीय स्पर्धेतील निवडीवरून लक्षात येते.
     यासाठी धनुर्विद्या मार्गदर्शक विठ्ठल भालेराव यांचे मार्गदर्शन लाभले.
वरील निवडीबद्दल संस्थेचे चेअरमन माननीय योगेश बोबडे, सचिव सुरजा बोबडे, प्राचार्य सिद्धलिंगप्पा प्रभाकर, संस्थेचे कोऑर्डिनेटर शंकर सोनटक्के यांनी त्यांच्या निवडीबद्दल अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा