Breaking

रविवार, २८ फेब्रुवारी, २०२१

दिव्यांग बांधवांना यु आयडी वैष्णवी कार्डवाटप.....


दिव्यांग बांधवांना यु आयडी वैष्णवी कार्डवाटप......

श्रीगोंदा-नितीन रोही,
 तालुक्यातील प्रहार अपंग संघटनेच्या व पंचायत समिती, जिल्हा परिषद अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमानाने श्रीगोंदा येथे दिव्यांग बांधवांना यु आयडी वैष्णवी कार्डचे वाटप श्रीगोंदा तालुका पंचायत समिती सभागृहामध्ये पार पडले. 101 दिव्यांग बांधवांना शासनाच्या वतीने वाटप करण्यात आले. यावेळी श्रीगोंदा प्रहार अपंग संघटनेचे तालुका अध्यक्ष राजेंद्र पोकळे, कार्याध्यक्ष,डॉ सोमनाथ देवकाते,हरिभाऊ खामकर, उपाध्यक्ष सुरेश गलांडे,पंचायत समितीचे गट विकास अधिकारी प्रशांत काळे,विस्तार अधिकारी जगताप,कांगुणे साहेब,भोग साहेब,गट शिक्षण अधिकारी शिंदे साहेब,पत्रकार नितीन रोही,पत्रकार चंदन घोडके सोनटक्के भाऊसाहेब, ज्ञानदेव भैलुमे,अजित गायकवाड,सह दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते पंचायत समितीचे गट विकास अधिकारी प्रशांत काळे यांनी अपंग संघटनेचे आभार व्यक्त करुन शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी तालुका अध्यक्ष राजेंद्र पोकळे यांनी आमचे अपंगाचे दैवत महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या प्रेरणेने गेली पंधरा वर्षे संघटनेमध्ये काम करीत असताना संघटनेचे राज्य अध्यक्ष बाबुराव काणे,जिल्हा अध्यक्ष लक्ष्मणराव पोकळे यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही दिव्यांगाचे काम करीत आहोत. याबद्दल प्रशासनाचे आम्ही आभार व्यक्त करतो. डॉक्टर हे अपंगासाठी आम्हाला देवच आहेत परंतु विविध अडचणीवर ती मात करून दिव्यांग नवी दिशा नवी आशा काम करीत असताना आम्हाला नवीन चैतन्य उभारण्यासाठी राज्याचे मंत्री बच्चुभाऊ कडू यांची प्रेरणा घेऊन आम्ही धडाकेबाज काम करणार आहोत अशी भूमिका प्रहार अपंग संघटनेचे तालुका अध्यक्ष राजेंद्र पोकळे यांनी या वेळी मांडळी व सर्वांचे आभार व्यक्त केले.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा