*श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयमध्ये मराठी भाषा गौरव दिन साजरा*
प्रतिनिधी/श्रीगोदे :-
२७ फेब्रुवारी हा जागतिक मराठी भाषा दिन आहे.
मराठी साहित्यिक वि.वा.शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांचा जन्मदिवस असल्याने त्याचे औचित्य साधुन मराठी भाषा दिन साजरा केला जातो.श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात "मराठी भाषा दिन" साजरा करण्यात आला.मराठी भाषेच्या विकासात आपले योगदान असावे तसेच मराठी भाषा किती महत्वाची आहे या जाणिवेतून या दिनाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सतिशचंद्र सूर्यवंशी हे होते.त्यांनी बापूंच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले.त्यांनी अध्यक्षीय उद्बोधनात मराठी भाषेची आजची स्थिती व भविष्यात आपल्या मातृभाषेविषयी कर्तव्याची जाणीव करून दिली.तसेच कुसुमाग्रज यांच्या जीवनपटावरती प्रकाश टाकत संतांचे मराठी साहित्यातील योगदानाची माहिती दिली.संत ज्ञानेश्वर,संत तुकाराम,संत एकनाथ यांचे मराठी साहित्यातील अनमोल योगदान त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.मुकुंद भोस यांनी केले तर आभार प्रा.श्रीकृष्ण कुरूमकर यांनी केले.या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक,सेवक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.लोखंडे मॅडम यांनी योगदान दिले.
विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण होऊन मराठी साहित्याबद्दल आवड निर्माण व्हावी.त्यातून प्रेरणा मिळवून वाचनाचे महत्त्व प्रतिपादित व्हावे.या उद्देशाने मराठी राजभाषा दिनाचे आयोजन व प्रयोजन करण्यात आले होते.
फोटो-मराठी भाषेचे महत्व प्रतिपादित करताना प्राचार्य.डॉ.सतिशचंद्र सूर्यवंशी
(छाया : राजेश बाराते)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा