Breaking

गुरुवार, २५ फेब्रुवारी, २०२१

नगराध्यक्षा अंकिता शहा यांचा दिव्यांग बांधवांनी केला सत्कार..



नगराध्यक्षा अंकिता शहा यांचा दिव्यांग बांधवांनी केला सत्कार..
l


 इंदापूर प्रतिनिधी- आदित्य बोराटे
   
     इंदापूर नगरपरिषदेच्या प्रतिवर्षी नियमित अंदाजपत्रकाच्या ५ पाच टक्के प्रमाणे दिव्यांग लाभार्थ्यांना प्रति  लाभ ९  हजार रुपये प्रमाणे १०४ लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये एकत्रित एकूण ९ लाख ३६ हजार रुपये रक्कम जमा करण्यात आली आहे. यावर्षीही ही रक्कम थेट त्यांच्या खात्यात जमा झाल्याने त्यांना मोठा आर्थिक आधार मिळाला आहे. 

         इंदापूर नगरपरिषदेच्या २०२०-२१ च्या अंदाजपत्रकानुसार ५ टक्के प्रमाणे हा निधी त्यांच्या खात्यात जमा करून बांधवांना त्यांच्या हक्काचा लाभ थेट खात्यात मिळाल्यामुळे दिव्यांग बांधवांनी इंदापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा अंकिता शहा व नगरसेवक भरत शहा यांचा सत्कार करून त्यांचे आभार मानले. 

      यावेळी दिव्यांग संघटनेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब पाडुळे, आनंद गायकवाड ,सचिन सूर्यवंशी, अमीर शेख ,रत्नपाल पाडुळे,इ. उपस्थित होते.

     दिव्यांग लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त करत इंदापूर नगरपालिका, नगराध्यक्षा, नगरसेवक, कर्मचारी यांचे आभार मानले. शासनाच्या सर्व योजना इंदापूर नगरपरिषदेच्या माध्यमातून प्रभावीपणे राबवित नागरिकांना लाभ देण्याचा प्रयत्न इंदापूर नगरपरिषदेचा असतो अशी प्रतिक्रिया यावेळी नगराध्यक्षा अंकिता शहा यांनी व्यक्त केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा