Breaking

गुरुवार, २५ फेब्रुवारी, २०२१

श्री सोमेश्वर देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदी प्रताप भांडवलकरश्री सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट, त्रैवार्षिक निवडणूक प्रक्रिया पूर्ण .



श्री सोमेश्वर देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदी प्रताप भांडवलकर

श्री सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट,  त्रैवार्षिक निवडणूक प्रक्रिया पूर्ण 



अध्यक्षपदी प्रताप भांडवलकर, सचिवपदी राहुल भांडवलकर तर खजिनदारपदी सोमनाथ भांडवलकर यांची निवड 


अकलूज दि.२५ प्रतिनिधी ( भाग्यवंत ल. नायकुडे  )  : प्रती सोरटीसोमनाथ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री सोमेश्वर देवस्थान करंजे ( तालुका बारामती जिल्हा पुणे ) च्या श्री सोमेश्वर देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त मंडळातील ८ विश्वस्तांच्या निवडीसाठी मतदान प्रक्रिया नुकतीच पुर्ण झाली 
श्री सोमेश्वर देवस्थान ट्रस्टच्या झालेल्या निवडणुकीतून  निवडून आलेल्या आठ विश्वस्थां मधून अध्यक्षपदी प्रताप मारुती भांडवलकर, सचिवपदी राहुल सोमनाथ भांडवलकर तर खजिनदारपदी सोमनाथ वसंत भांडवलकर यांची निवड झाली.   निवडून आलेले अन्य विश्वस्त याप्रमाणे आहेत. राजेंद्र अरुण भांडवलकर, संतोष पंढरीनाथ भांडवलकर, सागर सोमनाथ भांडवलकर, योगेश दिलीप भांडवलकर आणि सचिन माधव मोकाशी हे आहेत. नववे विश्वस्तपद हे पदसिध्द असून त्या पदावर चेअरमन, श्री सोमेश्वर सह. सा. कारखाना हे असतात. या निवडणुकीसाठी राजेंद्र अरुण भांडवलकर ,मोहन मुरलीधर भांडवलकर ,भाऊसाहेब रघुनाथ भांडवलकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. 
   द्वापार युगामध्ये या स्वयंभू आणि जागृत श्री शिवस्थानकाची निर्मिती झालेली असून तत्कालीन थोर  शिवभक्तीण मालुबाई यांच्या वचनामुळे करंजे गावी या स्थानकाची निर्मिती झाली अशी अख्यायिका आहे. शके अठराशे छत्तीस साली आबादास पाटील (रा.आंबवडे ता.खटाव जिल्हा सातारा) यांनी येथील महिमा वर आधारित श्री सोमनाथ महात्म्य ग्रंथ  लिहिला आहे.  या ग्रंथामध्ये भोलेनाथ अल्प सेवेत कसे प्रसन्न होतात हे सांगितले आहे. पूर्वी बारा वर्षे तपश्चर्या केल्यानंतर भोलेनाथ प्रसन्न होत असत .परंतु द्वापार युगातील मालुबाईने श्री शिवशंकरांस आपल्या खडतर भक्तीने वचनात बांधून घेतल्यामुळे समस्त शिवभक्तजनास त्याचा लाभ आजतागायत होत आहे.
 श्री सोमेश्वर देवस्थान ट्रस्टच्या नवनिर्वाचित विश्वस्तांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. येत्या सोमवारपासून नवीन पदाधिकारी आपल्या पदाची सूत्रे हाती घेणार आहेत असे श्री मोहन मुरलीधर भांडवलकर यांनीआमच्या प्रतिनिधीस सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा