Breaking

सोमवार, ८ फेब्रुवारी, २०२१

बोकडदरावाडीची जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा तंबाखूमुक्त घोषित



बोकडदरावाडीची जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा तंबाखूमुक्त घोषित

माढा / प्रतिनिधी- रेणुका रजपुत ,सोलापूर
 राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत केंद्र व राज्य शासन आणि सलाम बॉम्बे फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व शाळा व महाविद्यालये तंबाखूमुक्त करण्याची मोहीम सध्या जोमाने सुरू आहे त्याचाच एक भाग म्हणून माढा तालुक्यातील बोकडदरावाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा 4 फेब्रुवारी या जागतिक कर्करोग दिनाच्या दिवशी निकषांची पूर्तता केल्याने दोन वर्षांसाठी "तंबाखूमुक्त शाळा" म्हणून घोषित केल्याची माहिती शाळेचे मुख्याध्यापक शहाजी क्षीरसागर यांनी दिली आहे.

महाराष्ट्र शासन व सलाम बॉम्बे फाऊंडेशन यांच्या वतीने शाळा तंबाखूमुक्त करण्यासाठी जे प्रमुख 9 निकष दिले आहेत त्यांची पूर्तता सोलापूर जिल्हा समन्वयक शुभांगी लाड,केंद्रप्रमुख दिगंबर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापक शहाजी क्षीरसागर व सहशिक्षिका स्वाती गोसावी यांनी पालक,विद्यार्थी व शाळा व्यवस्थापन समितीच्या सहकार्याने केली आहे.शाळेला सलाम बॉम्बे फाउंडेशनच्या वतीने डिजिटल प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व बौद्धिक क्षमता विकसित करण्याबरोबरच चांगले आरोग्य आणि निरोगी शरीर याबाबत प्रबोधन व जनजागृती करण्यासाठी शासनाने हा उपक्रम हाती घेतला आहे.या विधायक व प्रेरणादायी यशाबद्दल जिल्हा परिषद सदस्य रणजितसिंह शिंदे, सभापती विक्रमसिंह शिंदे,उपसभापती धनाजी जवळगे,गटशिक्षणाधिकारी मारुती फडके,गटविकासाधिकारी डॉ.संताजी पाटील,विस्ताराधिकारी बंडू शिंदे यांच्यासह ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.

सध्या माढा तालुक्यातील मोजक्याच प्राथमिक व माध्यमिक विद्यालये तंबाखूमुक्त घोषित झाली आहेत त्यामुळे तालुक्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळा तसेच महाविद्यालये लवकरात लवकर तंबाखूमुक्त करण्यासाठी प्राचार्य, मुख्याध्यापक व शिक्षकांनी विशेष प्रयत्न करणे आवश्यक आहे.तसेच स्वत: व्यसनमुक्त राहून विद्यार्थी व समाजासमोर एक चांगला आदर्श निर्माण केला पाहिजे. प्रत्येक गावातील पालक व शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी व सदस्य आणि परिसरातील विक्रेते व दुकानदार यांनी सुद्धा सहकार्य केले पाहिजे. तालुक्यातील 100 टक्के शाळा तंबाखूमुक्त होण्यासाठी पंचायत समिती शिक्षण विभाग व सलाम बॉम्बे फाउंडेशनच्या वतीने 9 निकषांची पूर्तता करण्यासाठी योग्य ते सहकार्य आणि मार्गदर्शन केले जाईल अशी प्रतिक्रिया माढ्याचे गटशिक्षणाधिकारी मारुती फडके यांनी दिली आहे.

फोटो ओळी-1) मुख्याध्यापक शहाजी क्षीरसागर

 2) गटशिक्षणाधिकारी मारुती फडके.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा