*माणमध्ये डॉक्टरचे अपहरण करुन गाडीची जाळपोळ*
सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुक ठरावानंतर पानवन ता.माण येथील गंभीर घटना
वडूज प्रतिनिधी / शरद कदम
अज्ञातांनी डॉक्टरचे अपहरण करून गाडीची जाळपोळ झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. माण तालुक्यातील पानवन येथे शनिवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी संबंधित डॉक्टरांचा ठराव झाल्यानंतर घटना घडल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अज्ञाता विरूध्द अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पानवन ता.माण येथील डॉ. नानासाहेब शिंदे असे अपहरण झालेल्या डॉक्टरचे नाव आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार जिल्हा बँकेचा निवडणुकीसाठी चा सोसायटी मतदारसंघातून डॉ. नानासाहेब शिंदे यांचा ठराव घेण्यात आला होता. यानंतर डॉ.शिंदे शनिवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास आपल्या घरातून शेतात जात असताना अज्ञात इसमांनी डॉक्टरांचे अपहरण करून त्यांच्या गाडीची जाळपोळ केली आहे. ठरावानंतर ही घटना घडल्यामुळे माण तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलिस अधीक्षक, पोलिस उपाधीक्षक निलेश सुर्यवंशी, पोलिस निरीक्षक बाजीराव ठेकळे यांच्यासह पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. या प्रकरणी म्हसवड पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्या चे काम चालू असल्याचे आमच्या प्रतिनिधीने सांगितले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा