Breaking

रविवार, १४ फेब्रुवारी, २०२१

कार्यकारिणी पद नियुक्तीपत्र प्रदान व पदग्रहण सोहळ्याचे आयोजन




कार्यकारिणी पद नियुक्तीपत्र प्रदान व पदग्रहण सोहळ्याचे आयोजन*




माळशिरस प्रतिनिधी/भाग्यवंत नाईकवाडे
अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या पुणे विभागीय कमिटी तथा पश्चिम महाराष्ट्र विभागीय कार्यकारिणी नियुक्तीपद पत्र प्रदान आणि पदग्रहण सोहळा १७ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी१०.३० ते दुपारी २.०० या कालावधीत आयोजित केला आहे. अखिल भारतीय वारकरी मंडळाचे संस्थापक आणि राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प. श्री प्रकाश महाराज बोधले डिकसळकर (राष्ट्रीय कीर्तनकार) यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रमुख मार्गदर्शनाखाली संपन्न होणार असलेल्या सोहळ्याचे उद्घाटन खासदार गिरीश बापट यांच्या हस्ते होईल. गाथा लॉन्स, लोहगाव वाघोली रोड, संतनगर, श्रीक्षेत्र लोहगाव (ता. हवेली जिल्हा पुणे )  येथे होणार्या सोहळ्यास आमदार राहुल कुल, आमदार सुनील टिंगरे, माजी आमदार बापूसाहेब पठारे, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात, जगदीश मुळीक ( शहराध्यक्ष, भाजपा पुणे ) इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी हेच निमंत्रण समजून पंचक्रोशीतील सर्व वारकरी बंधू-भगिनी, प्रवचनकार, किर्तनकार, कथाकार, गायक, वादक आणि भजनी मंडळे याबरोबरच राजकीय सामाजिक व्यावसायीक क्षेत्रातील सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे नम्र निवेदन ह.भ. प.  श्री दत्तात्रय महाराज सोळसकर (पुणे विभागीय अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र ) व ह. भ. प.  दीपक महाराज खांडवे (पुणे विभागीय उपाध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र) यांनी संयुक्तपणे प्रसिद्धीसाठी दिलेले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा