Breaking

सोमवार, १ फेब्रुवारी, २०२१

बळीराम पाटील महाविद्यालयात माजी राज्य महसूलमंत्री डी. बी. पाटील यांचा वाढदिवस साजरा "

बळीराम पाटील महाविद्यालयात 
माजी राज्य महसूलमंत्री डी. बी. पाटील यांचा  वाढदिवस साजरा "


नांदेड जिल्हा प्रतिनिधी
बालाजी सिरसाट

किनवटच्या नागरिकांनी मला भरभरुन आशीर्वाद दिला.राजकीय क्षेत्रात नेतृत्व करण्यासाठी बळ दिले. किनवटच्या विकासासाठी नेहमी काम करीत आलो आहे. अतिदुर्गम डोंगराळ भागाचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील होतो. असे मत  माजी राज्य महसूलमंत्री डी. बी. पाटील यांनी बळीराम पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.याप्रसंगी विचारमंचावर आमदार भीमराव केराम, किनवट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रफुल्ल राठोड, भाजपा राज्य कार्यकारिणी सदस्या संध्याताई राठोड, भाजपा जेष्ठ व्यक्तीमत्व राघू मामा, सुधाकर भोयर, बजरंग राठोड, उत्तम जाधव, भावना दिक्षित,भाजपा तालुका अध्यक्ष  संदीप केंद्रे, किनवट शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष गंगारेड्डी बैनमवार,सचिव शंकर चाडावार, कैष्याध्यक्ष जसवंतसिंग सोखी, सदस्य नारायण सिडाम, रामराव जाधव, महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. एस. के. बेंबरेकर, उपप्राचार्य प्रा. राजकुमार नेम्मानीवार, पर्यवेक्षक प्रा. अनिल पाटील,यांची उपस्थिती होती. पुढे बोलतांना डी. बी.पाटील म्हणाले, राजकीय क्षेत्रात काम करतांना जात पाहून काम केले नाही. जातीच्या पुढे जाऊन सर्वांचा विकास कसा साधता येईल यासाठी काम केले.या परिसरातील समस्या ओळखुन सोडविण्यासाठी प्रयत्न केले.शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थी घडला पाहिजे या विचारांने या संस्थेने काम केले. राजकीय क्षेत्रात कार्य करतांना बरे वाईट अनुभव येत असतात.पंरतु नागरिकांसाठी काम करीत आलो आहे.असे मत व्यक्त केले. याप्रसंगी किनवट शिक्षण संस्थेचे सदस्य नारायण सिडाम यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक प्रा. डॉ. पंजाब शेरे यांनी  केले. याप्रसंगी महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा