*विधवा भाऊजयच्या आईचा केला नंदानी खून*
*
*टेंभुर्णी नजीकच्या दगड अकोले येथील घटना*
टेंभुर्णी प्रतिनिधी
विधवा भाऊजी चे लग्न दुसऱ्या मुलाबरोबर लावून देणार असल्याचा राग मनात धरून आपल्या भावाला
करणी केल्याच्या रागातून लक्ष्मी गोकुळ पवार या ४० वर्षीय महिलेचा खून केल्याची धक्कादायक घटना टेंभुर्णी नजीक असलेल्या दगड अकोले या गावांमध्ये घडली आहे.
याबाबत पोलिस ठाण्याकडून मिळालेली सविस्तर वृत्त असे की मयत लक्ष्मी पवार ही तरंगवाडी तालुका इंदापूर याठिकाणी आपल्या पती व मुलांसोबत राहण्यास असून त्यांची मुलगी कोमल हिचे गेल्या चार वर्षांपूर्वी दगड अकोले येथील सोमनाथ आगतराव काळे यांच्याबरोबर लग्न झाले होते.तो गेल्या दोन वर्षापूर्वी अपघातात मयत झाला त्यामुळे लक्ष्मी हीच कोमल हिची सासू व सासरे नंनद तिला मुलगी कोमलला भेटू देत नव्हते शनिवार दिनांक ३०/१२/२०२१ रोजी मुलगी कोमल हीच भेटण्याकरिता तरंगवाडी येथून मयत लक्ष्मी,तिची बहीण,चुलत भाऊ, लक्ष्मी चा जावई,चुलत मेहुणा असे सर्वजण दगड अकोले येथे संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास गेले असता. लक्ष्मीने तिच्या मोबाईल वरून कोमलची ननंद प्रिती उर्फ गुड्डी हीस फोन केला व मी अकोल्यात आले असून मला कोमला भेटायचे आहे. त्यामुळे तू मला तिची भेट घालून दे असे सांगितले तेव्हा नंदन गुड्डी हिने लक्ष्मीला एकटीला भेटण्यासाठी येण्याचे सांगितले तेव्हा मयत लक्ष्मी व तिचा जावई दोघे कोमलच्या घराकडे निघाले ते घराकडे येत असल्याचे पाहिल्यानंतर प्रीती उर्फ गुड्डी ने करणला परत लावण्यास सांगितले त्यानंतर करण तेथेच थांबला तेव्हा फिर्यादी ताई काळे हिने मयत लक्ष्मीस फोन करून फोन चालू ठेव असे सांगितले त्यानंतर तासभर फोन चालू ठेवून फिर्यादी ताई काळे हे फोनवरून संवाद ऐकत होते तासाभरानंतर आईग मेले असा लक्ष्मीचा आवाज आला व फोन कट झाला. तदनंतर फिर्यादीने मयत लक्ष्मीला भरपूर वेळा फोन लावण्याचा प्रयत्न केला परंतु तिचा फोन लागत नव्हता. त्यानंतर खूप उशीर झाला असल्याने फिर्यादी व इतर नातेवाईक तरंगवाडी परत गेले. आज लक्ष्मीचा फोन लागत नसल्यामुळे व कुठलाही निरोप नसल्यामुळे फिर्यादी व इतर नातेवाईकांनी टेंभुर्णी पोलीस स्टेशन येथे येऊन पोलिसांकडे तक्रार करून पोलिसांसोबत दगड अकोले येथे गेले असता. पोलिसांनी प्रीती उर्फ गुड्डी हीस विचारपूस केली. तेव्हा तिने काही माहीत नसल्याचा बनाव केला परंतु नंतर तिने लक्ष्मी ही कोमलला सोन्याहून पिवळे करणार होती, म्हणजेच तिचे दुसरे लग्न करणार होती व प्रीती उर्फ गुड्डीचा भाऊ सोमनाथ यांच्यावर मयत लक्ष्मी हिने करणी केली होती. म्हणून त्याचा बदला घेतला आहे असे सांगत मयत लक्ष्मीला प्रीती उर्फ गुड्डी,तिची बहीण कीर्ती व गुड्डीचा मित्र रॉकी यांनी मिळून जीवे मारून कॅनॉल जवळ असलेल्या विहिरीमध्ये मध्ये दगड बांधून टाकले आहे,असे सांगितले पोलिसांनी प्रीती उर्फ गुड्डी हिच्या सोबत जाऊन तिने दाखवलेल्या विहिरीजवळ जाऊन मयत लक्ष्मी हिचा मृतदेह या वरती काढला यावेळी मयत लक्ष्मीच्या नरड्यावर-हातापायावर वार केल्याचे दिसत होते अशा आशयाची फिर्याद ताई अशोक काळे (वय. 30 )राहणार तरंगवाडी तालुका इंदापूर यांनी टेंभुर्णी पोलीस ठाण्याकडे नोंदवली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा