*शहा गावचा नावलौकिक विकासातून करावा..*
इंदापूर : प्रतिनिधी शिवाजी पवार
शहा गावचे संरपंच पद जनरल असताना देखील मागासवर्गीय तरुण नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य कुमारी पुनम कडवळे हिला सरपंचपद बहाल केले. खरोखरच या गावातील प्रतिनिधींनी मनाचा मोठेपणा दाखवला आहे. म्हणूनच गावाने दिलेल्या संरपंच पदाच्या संधीचा फायदा घेऊन शहा गावचा विकास करुन नावलौकिक करावा असे मत पुणे जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया संघटक सचिव शिवाजीराव मखरे यांनी व्यक्त केले.
डाॅ. बाबासाहेब आंबेडकरनगर मधील जेतवन बुद्ध विहारात नवनिर्वाचित सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.
सुरुवातीला नूतन सरपंच कुमारी पूनम कडवळे यांनी गौतम बुद्धांच्या मुर्तीस पुष्पहार अर्पण करून दिपप्रज्वलन केले. तर नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य दिलीप पाटील यांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्रातील सर्वात तरुण नुतन महिला सरपंच कु. पूनम कडवळे व नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य दिलीप पाटील यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी पुणे जिल्हा आर.पी.आय. चे सचिव संघटक शिवाजीराव मखरे, आर.पी.आय. तालुकाध्यक्ष संदिपान कडवळे, प्रा. अशोक मखरे, इंदापूर नगरपरिषदेच्या नगरसेविका तथा महिला विकास व बालकल्याण समिती सभापती सौ. राजश्री अशोक मखरे, माजी नगरसेवक दादासाहेब सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब मखरे, मुकादम बापुराव मखरे, अॅड. किरण लोंढे, पी.आर.पी. शहराध्यक्ष शिवाजी मखरे, दादासाहेब साबळे, बजरंग मखरे, विनोद मखरे, संतोष कडवळे, विष्णु पाटील, माजी उपसरपंच दिलीप कडवळे, धनाजी देवकाते, शंकर निकम, सतिश गंगावणे, दादा भोई, उमेश बनसोडे, राहुल मखरे, प्रमोद मखरे, यशपाल सरवदे, बाळासाहेब ढावरे, अक्षय मखरे, जनार्दन खरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी महिलांची उपस्थित लक्षणीय होती. पद्मिनी मखरे, अनिता मखरे, शारदा मखरे, रेखा मखरे, मिना मखरे, शिला लोंढे, त्रिशला मखरे, सविता कांबळे, रेश्मा मखरे, संजाली मखरे, कोमल मखरे, राणी शिंदे, अश्विनी काकडे, करुणा मखरे, विवेका मखरे, प्रतिक्षा मखरे, कोयल मिसाळ, समृद्धी मखरे, सम्यका मखरे, सई मखरे इत्यादींची उपस्थिती होती.
प्रास्ताविक प्रा. अशोक मखरे यांनी केले तर आभारप्रदर्शन शिवाजी मखरे यांनी केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा