सांगवी गावच्या उपसरपंच पदी मा.वैभव तळे यांची निवड झाल्याबद्दल टिळक रोड मित्र मंडळ, टेंभुर्णी यांचे वतीने सत्कार
टेंभुर्णी/प्रतिनिधी
टेंभुर्णी (प्रतिनिधी)सांगवी तालुका करमाळा या गावच्या उपसरपंच पदी मा.वैभव ज्ञानेश्वर तळे यांची निवड झाल्याबद्दल टिळक रोड मित्र मंडळ, टेंभुर्णी यांचे वतीने त्यांचा व सर्व नूतन सदस्य, सरपंच यांचा सत्कार टिळक रोड येथे संपन्न झाला.नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकी मध्ये सांगवी तालुका करमाळा येथे ग्रामविकास आघाडी च्या सर्व च्या सर्व सात जागेवर विजय मिळवून निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले होते त्याच पार्श्वभूमीवर सरपंच व उपसरपंच निवडी वेळी एक एकमताने सरपंच पदी सौ लता आदिनाथ बनसोडे, तर उपसरपंच पदी वैभव तळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. कमी वयातच वैभव तळे यांनी राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळविले या मुळे त्याची सासुरवाडी टिळक रोड, टेंभुर्णी येथे सत्कार सोहळा ठेवण्यात आला. यावेळी नूतन सरपंच प्रतिनिधी आजीनाथ गोपीनाथ बनसोडे,नूतन सदस्य श्री पांडुरंग दिगंबर तळे ,श्री वीरकुमार दत्तात्रय तळे, दिनकर सौदागर तळे ,सत्यवान चंद्रकांत सरडे,संदीप काशिनाथ गवळी तसेच या निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावत असणारे अमोल कानडे, विलास तळे , कपिल घोडके, श्यामसुंदर सुतार, संदिप तळे,विश्वजीत तळे,नागेश गरकड,महादेव लांडगे, महेश सरडे ,राजकुमार घोडके यांचाही सत्कार करण्यात आला या वेळी नागेश कल्याणी, महादेव स्वामी, प्रमोद शिंदे, परमेश्वर खरात, यांनी आपल्या भाषणात विजयी उमेदवारांना शुभेच्छा दिल्या. तसेच या वेळी प्रमुखउपस्थिती मध्ये गटनेते नागेश बोबडे, पत्रकार सतिश काळे, जयवंत पोळ,गिरीश ताबे, परमेश्वर खरात, पत्रकार गणेश स्वामी तसेच टिळक रोड येथील पांडुरंग कानडे, संजय होदाडे, दादा विभुते, प्रमोद शिंदे, दादा भोसले, संतोष राजमाने, औदुंबर भोसले, शिवप्रसाद ताबे,महादेव स्वामी, नागेश कल्याणी, श्रीकांत लोंढे, योगेश भणगे, बाळासाहेब भोज, राजेंद्र डोके उद्धव गायकवाड, राजकुमार पवार आदी उपस्थित होते तर कार्यक्रम यशस्वी करणे साठी अँड संतोष कानडे, गणेश भोज, सतीश होदाडे, सचिन होदाडे, राहुल शिवपुजे, मंगेश ठाकूर, राजेंद्र साखरे, सारंग होदाडे, आनंद स्वामी, यांनी परिश्रम घेतले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा