राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात निष्ठावान कार्यकर्त्यांचा योग्य तो सन्मान राखला जाईल...हरीहरराव भोसीकर
नांदेड जिल्हा प्रतिनिधी
बालाजी सिरसाट
*दिनांक 20 फेब्रुवारी 2021 रोजी मुखेड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक संपन्न नांदेड जिल्ह्यातील युवक तालुका अध्यक्ष स्थानिक पातळीवर कार्येकर्त्यांना विश्वासात घेऊन निवड केली पाहिजे,परंतु तसे झाले नाही हे प्रत्येक तालुक्यातील युवक म्हणत आहेत, या बदल मी प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे प्रशन मांडणार, परंतु तुम्ही सर्व जुने व नवे कार्येकर्ते एक दिलाने काम करत रहा,जिल्ह्यातील व तालुक्यातील पक्ष संघटना निवड करत असताना, जे पक्षाच्या पडत्या काळात टिकून राहिले त्यांना पहिल जुन्या कार्येकर्त्यांचा विचार करण्यात येईल असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे जिल्हाअध्यक्ष हरीहरराव भोसीकर* यांनी म्हंटले आहे.
या वेळी *राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र सरचिटणीस वसंत सुगावे यांनी जिल्हयाच्या ठिकाणी कोणत्याही प्रशासकीय कामासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांना सहकार्य करेन व सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्येकर्ते एक दिलाने काम करावे असे म्हटले आहे व सध्या हे पूर्ण वर्ष हे निवडणुकीचे आहे या साठी युवक पदाधिकारी यांनी खचून न जाता जोमाने सामान्य जनतेचे काम करत रहा व जनते समोर जाह असे म्हंटले आहे*..
*नांदेड जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नांदेड जिल्ह्यअध्यक्ष हरीहरराव भोसीकर* यांच्या अध्यक्षतेखाली व *शिवाजी जाधव साहेब यांच्या नेतृत्वाखाली* मुखेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय येथे पक्षाच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते . या कार्यक्रमाला, *प्रदेश कार्येकर्णी सदस्य कल्पनाताई डोंगळीकर* *राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस वसंत सुगावे व बाळासाहेब भोसीकर ,संतोष पाटील दगडगावकर रा. का. ग्रंथालय जिल्हा अध्यक्ष महिला राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाअध्यक्ष प्रांजलीताई रावनगावकर,* राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष मांजरमकर् ,महिला जिल्हा उपाध्यक्ष राहेरे ताई, मुखेड राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते विठलराव इंगळे सर, नागनाथ पाटील पाळेकर, *राष्ट्रवादी कांग्रेस सोशल मिडियाचे जिल्हाअध्यक्ष शेख शादुल(होनवडजकर)* प्रदेश प्रतिनिधी कैलास मादसवाड, रोहित दादा विचार मंच जिल्हाअध्यक्ष बालाजी पाटील सांगवीकर, सामाजिक न्याय विभाग जिल्हाअध्यक्ष कपिल कांबळे, *मुखेड राष्ट्रवादी युवक काँग्रेस युवा नेते संभाजी मुकनर,तालुका सचिव अड लक्ष्मण सोमवारे, व महिला आघाडी पंचफुलाताई बिराजदार, महिला शहर अध्यक्ष अड भाग्यश्री ताई कासले* रा.यु. का. ता. अध्यक्ष रमाकांत जाहुरकर विधानसभा सनमवयक प्रताप चौधरी, अशोक बचेवार,नागनाथ गायकवाड,तालुका कोषाध्यक्ष आनंदा शिंपाळे, सामाजिक न्याय विभाग तालुका अध्यक्ष शिवाजी कबनुरकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्येकर्ते उपस्थित होते, मुखेड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष शिवाजी जाधव साहेब यांनी जिल्हा नेत्यांचा शाल पुष्पहार देवून सत्कार केला*
तसेच मुखेड तालुका व शहर अध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे नियुक्ती पत्र देण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रवादी काँग्रेस सो.मी.सेल जिल्हाअध्यक्ष शेख शादुल(होनवडजकर) व सूत्रसंचलन शहर कार्याध्यक्ष जयभीम सोनकांबळे यांनी केले.. यावेळी मुखेड तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी युवक काँग्रेस व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, राष्ट्रवादी सोशल मीडिया, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा