विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याची संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध
आमदार बबनराव शिंदे
बेंबळे। प्रतिनिधी
पिंपळनेर ता. माढा येथील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याची २०२१ ते २०२६ या कालावधीतील पंचवार्षिक निवडणूक प्रक्रियामध्ये दि.१५ रोजी झालेल्या अर्जाच्या छाननीमध्ये २१ जागांसाठी २१ अर्ज वैध ठरल्यामुळे निवडणूक बिनविरोध झाली. आता या निवडीची औपचारिकता बाकी असल्याची माहिती या कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष आ. बबनराव शिंदे यांनी दिली.
यावेळी बोलताना आ. शिंदे म्हणाले की बहुराज्यीय संस्थांचा सहकारी कायदा २००२ च्या तरतुदीनुसार विठ्ठलराव शिंदे कारखान्याची २०२१ ते २०२६ या पंचवार्षिक कालावधीची निवडणूक प्रक्रिया दि. १ फेब्रुवारी पासून राबवण्यात येत असून दि. १५ रोजी दाखल नामनिर्देशन अर्जाची छाननी होऊन २१ जागांसाठी २१ अर्ज वैध ठरले आहेत. ही निवडणूक बिनविरोध झाल्याची घोषणा २१ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत निवडणूक निर्णय अधिकारी कुंदळ भोळे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, सोलापूर हे करणार असल्याचे आ.बबनराव शिंदे यांनी सांगितले. या कारखान्याच्या सर्वांगीण प्रगतीमध्ये सभासद शेतकऱ्यांचे बहुमोल सहकार्य लाभले असून ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना, रासप, शेकाप, मनसे, रिपाइं व सर्व शेतकरी संघटना यांनी समजूतदार पणे सहकार्य केले त्या मुळे आम्ही सर्वांंचे आभारी आहोत असे यावेळी आ. शिंदे यांनी सांगितले.
अधिक माहिती देताना आ.बबनदादा शिंदे म्हणाले कि चालू वर्षी विठ्ठलराव शिंदे कारखान्याने पिंपळनेर येथील युनिट नं. १मधे १३ लाख ८२ हजार मेट्रिक टन तर करकंब येथील युनिट २ या कारखान्यात ३ लाख ७१ हजार मेट्रिक टन गाळप केले असून २ कोटी युनिट वीज तयार केली आहे. ऊस बीलापोटी प्रतिटन दोन हजार रु. प्रमाणे, ३१ जानेवारी पर्यंत २५२ कोटी रूपये शेतकऱ्यांचा खात्यावर जमा करण्यात आले आहेत. चालू गळीत हंगामात ११.२० साखर उतारा मिळाला आहे. कामगारांची ग्रुप ग्रॕच्युटी उतरवली असून भविष्यात कामगारांना कुठलीही अडचण येणार नसल्याचे आ.शिंदे यांनी आवर्जून सांगितले.
सध्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत
२१संचालका मध्ये उत्पादक सभासद १५, अनुसुचित जाती/जमाती १, महिला १, सहकारी संस्था १, भटक्या जमाती १, इतर मागासवर्ग १, आर्थिक मागासवर्ग १ असे एकुण २१ संचालक आहेत.
कारखान्याने सभासद शेतकरी व संचालक मंडळाचा सहकार्याने देशात नावलौकिक मिळवला असून २ हजार ५०० मेट्रिक टन गाळपक्षमतेचा कारखाना १२ हजार मेट्रिक टन केला आहे. डिस्टलरी क्षमता ३० केएलपीडी वरून १५० केएलपीडी, को जनरेशन क्षमता ७.५ वरून ३८ मेगावॕट तसेच २५० मेट्रिक रिफाईन शुगर प्रकल्प यशस्वीपणे कार्यान्वित केले आहेत. ५० लाख लिटर इथेनॉल पेट्रोलियम कंपन्यांना दिले असून ७० लाख लिटर इथेनॉल पुरवठा करण्याचा करार करण्यात आल्याचे आ. शिंदे यांनी या वेळी सांगितले.
२०२१ते २०२६ या कालावधीसाठी असलेले २१ संचालक...
१) आ. बबनराव विठ्ठलराव शिंदे, २) रमेश व्येंकटराव येवलेपाटील, ३) वामनराव उबाळे, ४) सुरेश मारूती बागल, ५) पोपट दिगांबर गायकवाड, ६) अमोल सौदागर चव्हाण, ७) निळकंठ भगवान पाटील, ८) शिवाजी महादेव डोके, ९) लक्ष्मण रामदास खुपसे, १०) विष्णू महादेव हुंबे, ११) प्रभाकर गंगाधर कुटे, १२) भाऊराव भानुदास तरंगे, १३) रणजीतसिंह बबनराव शिंदे, १४) लाला मारूती मोरे, १५) वेताळ जालींदर जाधव, १६) सचिन कल्याण देशमुख, १७) विक्रमसिंह बबनराव शिंदे, १८) पांडूरंग देवराव घाडगे, १९) पोपट बलभिम चव्हाण, २०) सिंधुताई सुभाष नागटिळक, २१) संदीप भुजंगराव पाटील

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा