*डॉ. गित्ते यांनी बीड जिल्हा रुग्णालयाचा घेतला आढावा*
गेवराई प्रतिनिधी- नवनाथ आडे
वाढत्या कोरोनाला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनासह आरोग्य व्यवस्था सतर्क झाली असून जिल्हा रुग्णालयाच्या कोविड वॉर्डात आज दि. 23 रोजी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुर्यकांत गिते यांनी राऊंड घेत कोरोना रुग्णांची तपासणी बरोबर व्यवस्थेची पाहणी केली.
कोरोना रुग्णाला कुठलीही आरोग्य सेवा कमी पडता कामा नये अशा सक्त सूचना देत जिल्हावासियांना कोरोनाचे लक्षणे जाणवताच तात्काळ कोरोना तपासणी करून घेण्याचे आवाहन केले.
लसीकरणा दरम्यान उडत असलेल्या गोंधळावर टोकन पद्धत यापुढे राबवली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यातील काही शहरांमध्ये कोरोनाचा आकडा मोठ्या प्रमाणावर वाढू लागल्याने काही ठिकाणी लॉकडाऊन सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. बीडमध्येही आठवडाभरात कोरोना रुग्ण वाढताना दिसून येत आहे.
या अनुषंगाने आज सकाळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुर्यकांत गित्ते यांनी जिल्हा रुग्णालयातील कोविड वॉर्डात प्रत्यक्ष जात रुग्णांची तपासणी केली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा