किनवट येथील कोविड केअर सेंटर चालू करण्याची मागणी...
नांदेड जिल्हा प्रतिनिधी
बालाजी सिरसाट
किनवट तालुका अंतर्गत कार्यरत असलेले कोविड केअर सेंटर चालू करण्याची जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे मागणी.
किनवट येथील कोविड केअर सेंटर रुग्णांची संख्या कमी झाल्याने बंद करण्यात आले होते.व तेथील अधिकारी व कर्मचारी यांना कार्यमुक्त करण्यात आले होते.सद्यस्थितीत कोविड रुग्णसंख्या वाढत असल्याने डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर येथे फक्त ५० रुग्णाची व्यवस्था आहे.सध्या ७० ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.दिनांक १०-फेब्रुवारी २०२१ ते ०९ मार्च २०२१ पर्यंतचे POSITIVE रुग्णांची संख्या RTPCR - ४२, ANTIGEN TEST- ११० RTPCR+ RAPID= १५२ एवढी रुग्ण संख्या वाढली आहे.त्यामुळे त्यांच्या राहण्याचे व्यवस्थापण करण्यास अडथळा होत आहे. रुग्णांना दाखल करून घेण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच अधिकारी व कर्मचारी यांची संख्या कमी प्रमाणात असल्याने आपल्या स्तरावरून तालुका किनवट येथील कोविड सेंटर कार्यान्वित करण्याबाबतचे आदेश निर्गमित करून सहकार्य करावे अशी मागणी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे वैद्यकीय अधिक्षक उत्तम धुमाळे यांनी पत्राद्वारे केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा