*आंतरराष्ट्रीय पातळीवरील पुरस्काराने जबाबदारी वाढली- तानाजी भाऊ जाधव*
*करमाळा तालुका प्रतिनिधी- अतुल वारे पाटील*
आंतरराष्ट्रीय पातळीवरील नेल्सन मंडेला नोबेल पीस अवार्ड 2020 व अमेरिकन विद्यापीठाकडून डॉक्टरेट पदवी मिळाल्याने आपली जबाबदारी वाढली अडून भविष्यकाळात आपण टायगर ग्रुप च्या माध्यमातून अधिक उत्साहाने काम करणार असल्याची ग्वाही टायगर ग्रुप चे संस्थापक व देशभरातील तरुणांच्या गळ्यातील ताईत असलेले डॉ तानाजीभाऊ जाधव यांनी सदर प्रतिनिधींशी बोलताना दिली.
तानाजीभाऊंमुळे करमाळ्याचे नाव राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचल्याच्या पार्श्वभूमीवर डॉ तानाजीभाऊ जाधव यांची विशेष मुलाखत घेण्यात आली. यावेळी त्यांनी टायगर ग्रुप चा प्रवास प्रतिनिधी समोर मांडला.टायगर ग्रुपचा विस्तार आंतरराष्ट्रीय स्तरावर पोचला असून नुकत्याच मिळालेल्या पुरस्कारामुळे टायगर ग्रुपच्या कार्यावर शिक्कामोर्तब झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
देशपातळीवर माझ्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी विक्रमी रक्तदान केल्याचे सांगत यावर्षीच्या वाढदिवसावर कोरोनाचे सावट असल्याने आपण सामाजिक संकेत पाळत कार्यकर्त्यांना करमाळ्यात येण्यापासून रोखल्याचे त्यांनी सांगितले. टायगर ग्रुपच्या माध्यमातून अनेक भगिनींचे संसार सावरल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. तरुणांना विधायक उपक्रमातून दिशा देण्याचा प्रयत्न आपण अहोरात्र करत असून यापुढेही टायगर ग्रुपच्या माध्यमातून हा सामाजिक कार्याचा गाडा पुढे चालत राहील.
या पुरस्काराच्या माध्यमातून देशभरातून कार्यकर्ते,हितचिंतक यांनी कौतुकाचा वर्षाव केला त्याबद्दल सर्वांचे ऋणी असल्याची भावना त्यांनी शेवटी बोलताना व्यक्त केली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा