Breaking

शुक्रवार, १९ मार्च, २०२१

वाढीव वीजबिल व वीजकनेक्शन तोडणीच्या विरोधात स्वाभिमानीचा कुंभेज फाटा येथे रास्ता रोको*




*वाढीव वीजबिल व वीजकनेक्शन  तोडणीच्या विरोधात स्वाभिमानीचा कुंभेज फाटा येथे रास्ता रोको*
*करमाळा तालुका प्रतिनिधी- अतुल वारे पाटील*

      वाढीव विज बिल, तोडलेली वीज कनेक्शन व चुकीच्या पद्धतीने विज बिल वसुली याच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सर्व पक्षीय रस्ता रोको आंदोलन कुंभेज फाटा येथे करण्यात आले.
      यावेळी अॅड सविता शिंदे,संभाजी ब्रिगेड चे ता.अध्यक्ष अमित घोगरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष रवी अण्णा गोडगे, यांची भाषणे झाली. यावेळी शेतकऱ्यांचे विज कनेक्शन कट व वाढीव विज यावर लवकरात लवकर निर्णय न झाल्यास शेतकरी आणखीनही तिव्र व कोरोणा महामारीचा कुठलाही विचार न करता आंदोलन करेल असे सांगण्यात आले .यावेळी स्वाभिमानीचे तालुका अध्यक्ष सुदर्शन शेळके.संभाजी ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष शंकर पोळ, ता.अध्यक्ष अमित घोगरे,स्वा.ता.युवाध्यक्ष अमोल घुमरे,ता पक्षाध्यक्ष बापू फरतडे,ता.युवाऊपाध्यक्ष बापू वाडेकर, तालुका उपाध्यक्ष तानाजी शिंदे,स्वाभिमानी नेते दिपक शिंदे, व शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा