*अज्ञात वाहनाच्या धडकेत पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू*
गेवराई प्रतिनिधी- नवनाथ आडे
गेवराई:- रात्रगस्तीवर असलेल्या गेवराई पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्याचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना धुळे-सोलापूर महामार्गावर घडली आहे. येथील गढी उड्डाणपुलावर आज दि, ८ रोजी पहाटेच्या सुमारास विवेक सदाशिव कांबळे (वय 34) कर्तव्यावर होते. त्यांची गेवराई पोलीस ठाण्यात नेमणूक होती. कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या मृत्यूने जिल्हा पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस कर्मचारी धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील गढी उड्डाणपुलावर पेट्रोलिंग करत होते. आज पहाटेच्या सुमारास कांबळे हे पोलीस व्हॅनमधून खाली उतरले असता अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली, यात त्यांचा मृत्यू झाला. घटनास्थळी महामार्ग पोलिसांनी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी गेवराई उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला. धडक दिलेल्या त्या अज्ञात वाहनांचा पोलीस शोध घेत आहेत. कर्तव्यावर असताना कांबळे यांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
********-*********************************
......
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा