Breaking

शुक्रवार, १९ मार्च, २०२१

परिते प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना लसीकरण सुरू..



परिते प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना  लसीकरण सुरू..

बेंबळे प्रतिनिधी/सज्जन शिंदे 

बेंबळे प्रतिनिधी:- परीते प्राथमिक आरोग्य केंद्रात शुक्रवार (दि. १९) पासून कोरोना लसीकरण सुरू झाल्याची माहिती तालुका वैद्यकीय  आरोग्यअधिकारी डॉ शिवाजी थोरात यांनी AJ 24 Taas News Maharashtra" ला दिली. या नविन लसीकरण केंद्राचा लाभ परीते प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कक्षेअंतर्गत असलेल्या बेंबळे, परीते, वेणेगाव, वरवडे  घोटी, मिटकलवाडी, अकोले बु, परीतेवाडी, भुईंजे, आकुंभे, आहेरगाव व व्होळे या गावांतील ३० ते ३२ हजार नागरिकांना  होणार आहे.

या अगोदर परीते प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कक्षेतील गावे टेंभुर्णी प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जोडलेली होती. यामुळे टेंभुर्णी प्राथमिक आरोग्य केंद्रावर भार वाढला होता. हा अतिरिक्त भार कमी करून या भागातील नागरिकांच्या सोयीसाठी परीते येथे लसीकरण केंद्र सुरू केले आहे. परिते आरोग्य केंद्राची इमारत सुसज्ज असून यामध्ये लसीकरणासाठी आवश्यक त्या सोयी उपलब्ध आहेत. या ठिकाणी दोन डॉक्टर, एक आरोग्य सहाय्यक, लॅब टेक्निशियन, पाच आरोग्य सेविका एक क्लार्क व दोन परिचर असे कर्मचारी आहेत.
तसेच या आरोग्य केंद्रासाठी स्वतंत्र रुग्णवाहिका ही आहे. यामुळे लसीकरण सुसह्य होणार आहे.

राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार लसीकरणासाठी पात्र असणाऱ्या ४५ ते ५९ वयाच्या दुर्धर आजाराने त्रस्त असणाऱ्या परीते प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कक्षेतील नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता निर्धास्तपणे परीते आरोग्य केंद्रावर लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन तालुका वैद्यकीय आरोग्याधिकारी डॉ शिवाजी थोरात व परीते प्राथमिक केंद्राचे डॉ आरती भारती यांनी केले आहे. लसीकरणानंतर सुध्दा सामाजिक अंतर, मास्क, वेळोवेळी सँनिटायझेशन ही त्रीसुत्रीचा अवलंब करणेही गरजेचे आहे. अशी सुचना देखील केली आहे.

दरम्यान लसीकरण प्रभावीपणे पार पाडण्यासाठी डॉ शिवाजी थोरात, डॉ श्रीमती भारती, डॉ सातपुते, यांच्यासह सामुदायिक आरोग्य अधिकारी डॉ. गोरे, डॉ गव्हाणे, डॉ चेवले, श्रीमती स्वामी, पी एस पाटील, रमेश थोरात, ए सी गरड, सर्व गट प्रर्वतीका, आरोग्य सेविका व आशा कार्यकर्ती परिश्रम घेत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा