*सोलापूर जिल्हा लॉकडाऊन च्या दिशेने?*
*सोलापूर जिल्ह्यात कोरोना रोखण्यासाठी कडक निर्बंध मिलिंद शंभरकर*
*सोलापूर प्रतिनिधी/AJ 24 Taas News
सोलापूर जिल्ह्यामध्ये कोरोना रोखण्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज सायंकाळी सुधारित आदेश काढला आहे
त्या आदेशानुसार आज पासून सोलापूर शहर वगळता जिल्ह्यातील सर्व दुकाने सकाळी सात ते सायंकाळी सात वाजेपर्यंत चालू राहतील सायंकाळी सात ते सकाळी सात वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहतील तसेच सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्व गावातील आठवडे बाजार बंद करण्याचे आदेश जारी केले असून त्याच बरोबर शहर वगळता जिल्ह्यामधील शनिवारी व रविवारी सर्व दुकाने बंद राहतील तसेच खाद्य व परमिट रूम व बार फक्त सकाळी सात ते सायंकाळी आठ वाजेपर्यंत चालू राहणार असून या कालावधीमध्ये कोव्हिच्या नियमाचे पालन करून 50%च्या क्षमतेने सुरू ठेवावे
या आदेशानुसार अत्यावश्यक सेवा वगळता/मनुष्य;प्राणी मात्रा साठी जीवनावश्यक वस्तू भाजीपाला व फळे ,किराणा,दूध ,व वृत्तपत्र वितरण बाबींना सूट देण्यात आली आहे.
होम डिलिव्हरी साठीहॉटेल किचन व वितरण कक्ष रात्री दहा वाजेपर्यंत सुरु ठेवण्यात परवानगी देण्यात आली आहे जिम व्यायाम शाळा स्पोर्टस कॉम्प्लेक्सखेळाची मैदाने जलतरण तलाव हे वैयक्तिक सरावासाठी सुरू राहणार आहेत या सर्व प्रकरणी धार्मिक स्थळे सकाळी सात ते सायंकाळी सात वेळेस सुरू राहतील असे आदेश जारी केले असून हे आदेश शहर वगळता सोलापूर ग्रामीण भागामध्ये लागू राहतील असे आदेश जारी केला आहे.
*************२
३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा