*शेलगाव ता. कळंब येथील असंख्य महिलांचा वंचित बहुजन आघाडित जाहिर प्रवेश*
दिनांक 25/03/2021 रोजी सायंकाळी ठिक 7.30 वाजता शेलगाव ( दि. ) ता. कळंब येथील असंख्य महिलांचा महिला जिल्हाध्यक्षा अँड. जिनत प्रधान यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडित जाहिर प्रवेश केला . या साठी सदर गावच्या सीमा चंदनशिवे पुढाकार घेऊन या कार्यक्रमाचे आयोजन केले तर सुमन पायाळ यांनी त्यांना मार्गदर्शन व सहकार्य केले . या कार्यक्रमासाठी उस्मानाबाद येथून महिला जिल्हाध्यक्षा अँड. जिनत प्रधान, कोषाध्यक्षा रुक्मीनी बनसोडे , जिल्हा महासचिव बाबासाहेब जानराव ,व विद्यानंद वाघमारे हे उपस्थित होते.
प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा