*कूर्डू ते उजनी रस्त्याचे डांबरीकरण त्वरित मंजूर करावे अन्यथा... आरपीआय ची मागणी..*
कुर्डूवाडी प्रतिनिधी दि.
माढा तालुक्यातील कुर्डूवाडी -टेंभुर्णी रस्त्या लगत असणारे कुर्डू हे गाव रस्त्यालगत असून या गावांमधून कुर्डू ते उजनी जुना रस्ता जात असून माढा तालुक्यातील दोन आमदार असताना सुद्धा या रस्त्याकडे दुर्लक्ष्य झाले असून याकडे लक्ष देणे गरजेचे असताना सुद्धा दिले नसल्याचे दिसून येत असून हा रस्ता कूर्डू ते उजनी रस्त्याचे डांबरीकरण त्वरित मंजूर करावे व अनेक दिवसापासून या रस्त्याची अडचण सोडवावी या मागणीचे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर)पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख गणेश ( दादा) घुगे यांच्या वतीने प्रांताधिकारी कुर्डूवाडी यांना देण्यात आले. मा.नायब तहसीलदार श्री. कदम साहेब यांनी निवेदन स्वीकारले.. याप्रसंगी , कपिल भोसले, भाऊसाहेब अस्वरे, विकी गिरी, निहाल शेख, महाशूर शिंदे, अमोल अस्वरे, महेश चव्हाण उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा