मोराळे ग्रामपंचायत सरपंचपदी संदीप शिंदे व उपसरपंच पदी प्रेमला निकम यांची सर्वानुमते निवड
वडूज प्रतिनिधी / शरद कदम
अत्यंत चुरशीने पार पडलेल्या मोराळे ग्रामपंचायत निवडणुकीत जेष्ठ राजकीय मान्यवर व युवाशक्तीने जोरदार लढत देऊन मोराळे ग्रामपंचायत ताब्यात घेतली होती. आरक्षण निश्चित झाल्यावरही काही ठिकाणावरील आरक्षण प्रश्नी पेच निर्माण झाल्याने काहीकाळ सरपंच निवड लांबणीवर पडली होती.परंतु शासनाच्या निर्णयाने पुन्हा आरक्षण जाहीर झाल्याने मोराळे येथील ग्रामपंचायतीच्या गाव कारभाऱ्यांच्या निवडी पार पडल्या. यामध्ये सर्वानुमते सरपंच पदी संदीपभाऊ जयसिंग शिंदे यांची तर उपसरपंच पदी सौ.प्रेमला किरण निकम यांची निवड करण्यात आली.
निवडणुक अधिकारी म्हणून श्री.बाबर रावसाहेब ( मंडल अधिकारी कातरखटाव) याच्या मार्गदर्शन व सुचना नुसार या निवडी शांततेत पार पडल्या. यावेळी उपस्थिती सर्व सदस्य यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी ग्रामसेविका पवार, तलाठी कांबळे व कर्मचारी उपस्थित होते.
चौकट- शासनाने अधोरेखित केलेल्या १४ व्या वित्त आयोगा व्यतिरिक्त ग्रामीण भागातील शेतकरी,सर्वसामान्य लोकांसाठी अनेक योजना शासन राबवित असते. मोराळे ग्रामपंचायतीच्या नव्याने निवडून आलेल्या नूतन पदाधिकारी व सदस्यांनी या शासकीय योजना गावातील सर्वसामान्यांसाठी राबवून गावकऱ्यांनी आपल्यावर दाखवलेल्या विश्वास सार्थक ठरवावा- अक्षय निकम, जिओकॉन कन्सल्टन्सी कंपनी पुणे,संचालक (मोराळे).
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा