Breaking

रविवार, १४ मार्च, २०२१

सांगोल्याच्या गट विकास अधिकाऱ्याच्या विरोधात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर संभाजी ब्रिगेडचे आंदोलन स्थगित-सचिन जगताप




सांगोल्याच्या गट विकास अधिकाऱ्याच्या विरोधात
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर संभाजी ब्रिगेडचे आंदोलन स्थगित-सचिन जगताप


सांगोला प्रतिनिधी

पंचायत समितीतील शिवजयंतीच्या कार्यक्रमाला गैरहजर राहणाऱ्या सांगोल्याच्या गटविकास अधिकारी व विभागप्रमुखांवर कडक कारवाई करावी या मागणीसाठी सोमवार दिनांक १५ मार्चला जिल्हा परिषदेसमोर संभाजी ब्रिगेडच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता.

यासाठीचे निवेदनही देण्यात आले होते. दरम्यान सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी याबाबतीत दोन दिवसात बैठक घेऊन कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर संभाजी ब्रिगेडने हे आंदोलन स्थगित केल्याची माहिती जिल्हाध्यक्ष शिवश्री सचिन जगताप यांनी दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा