Breaking

मंगळवार, ९ मार्च, २०२१

*आई बाबा फाउंडेशन तर्फे जागतिक महिला दिन थाटात संपन्न*

आई बाबा फाउंडेशन तर्फे जागतिक महिला दिन थाटात संपन्न*
      चव्हाणवाडी प्रतिनिधी... अमोल भोसले

. येथील आई-बाबा फाउंडेशन या  सेवाभावी संस्थेच्या वतीने *८ मार्च जागतिक महिला दिन* मोठ्या थाटात संपन्न झाला
        फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष  नवनाथ नांगरे गुरुजी यांच्या निवासस्थानासमोर सदरील कार्यक्रम पार पडला

     यावेळी अनेकांनी महिलां बाबत आपापले मनोगत व्यक्त केले

     महिलांच्या मतांचा आदर करा त्यांना समजून घ्या.... तरच संसारी जीवनाचा खरा अर्थ कळेल... असेच असे मत यावेळी फाऊंडेशनचे अध्यक्ष नवनाथ नांगरे गुरुजी यांनी व्यक्त केले

      यावेळी गिता धनंजय सलगर 
यांनी महिलांना *रणराघिणी व्हा वाघीनी बणा* असा  उपदेश दिला
     पुरुष मंडळींनी महिलांच्या ...मुलींच्या पाठीशी राहावे.....   जगातल्या अशक्य गोष्टी त्या निश्चित शक्य करतील... अशी अपेक्षा कु. सृष्टी नवनाथ नांगरे हिने व्यक्त केली
      जिजामाता लक्ष्मी अहिल्ये चे दाखले देत नारी आदर्शचे प्रतीक असल्याचे मत सौ ऋशाली बंकट खडके हिने मांडले

    महिला दिन साजरा करण्याची गरजच का पडावी ... महिला खरोखरच अबला आहेत का...??? असा ज्वलंत प्रश्न उभा करत स्त्री भ्रूण हत्या थांबवून स्त्री जन्माचे स्वागत करा.. त्यांना उच्च शिक्षण द्या... असे परखड मत प्राध्यापिका स्मिता मनोज नांगरे यांनी व्यक्त केले
          समाजाची मानसिकता बदलतेय ... स्त्री जन्माचे स्वागत होताना दिसते आहे ...अशी सकारात्मक भावना टेंभुर्णी शहर काँग्रेसचे अध्यक्ष सोमनाथ काका कदम यांनी व्यक्त केले

     यावेळी श्री भीमराव भरगंडे सर यांनी महिलांना संपूर्ण पाठिंबा  देण्याचे पुरुषांकडे आवाहन केले
      शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे
महिलांना उच्च शिक्षण द्या....त्या नक्कीच यशाचा झेंडा रोवतील
असा आशावाद फाउंडेशनचे स्वागताध्यक्ष अण्णासाहेब इंदलकर यांनी व्यक्त केला
     कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी *सौ जयश्री भिमराव भरगंडे* (उपाध्यक्ष राष्ट्रवादी महिला आघाडी सोलापूर जिल्हा) प्रमुख अतिथी म्हणून *सौ आशालता अरुण चव्हाण सौ प्रा स्मिता मनोज नांगरे सौ सिंधुबाई अर्जुन सलगर सौ *स्वाती हनुमंत चव्हाण*
 उपसरपंच सौ *साळूबाई बाळासाहेब मोटे* सौ *ज्योती सुभाष इंदलकर* आणि गावच्या पोलीस पाटील सौ *लक्ष्मी हनुमंत इंदलकर पाटील* ह्या होत्या

     यावेळी फनी गेम्स म्हणून *संगीत खुर्ची* .... स्पर्धा झाली
   या स्पर्धे मधील  बारा महिलांना
चहापानाचा ट्रे ....कप बशी सेट
बक्षीस म्हणून मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला
      सर्वच उपस्थित आणि सहभागी महिलांना स्पेशली एक -एक गिफ्ट ॲटम देण्यात आले
या कार्यक्रमासाठी  महिलां सोबतच पुरुष मंडळी बहुसंख्येने उपस्थित होते...
       यात प्रामुख्याने नूतन सरपंच सुनील बापू मिस्कीन विद्यमान ग्रामपंचायत सदस्य नवनाथ शिंदे
बाळासाहेब मोटे अर्जुन  अण्णा सलगर सुभाष इंदलकर भारत जगताप प्रा मनोज नांगरे ...शरीफ काझी (वंचित बहुजन आघाडी माढा लोकसभा मतदार संघ अध्यक्ष) आमीर भाई काझी गाडेकर सर महावीर बाबा नांगरे ॲड सचिन चव्हाण  सौदागर भाऊ नांगरे हनुमंत आबा पाटील इंदलकर पाटील विशाल भोसले अनिल नांगरे  नरहरी नांगरे धनंजय भोसले (पञकार)
सह बरेच ग्रामस्थ आणि मान्यवर उपस्थित होते 
      
      कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फाउंडेशनचे अध्यक्ष *नवनाथ नांगरे  गुरुजी* यांनी केले 
    तर आभार कार्याध्यक्ष *धनंजय सलगर* यांनी मानले 
       कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी फाउंडेशनचे उपाध्यक्ष *राजेंद्र कदम* यांनी मोलाचे योगदान दिले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा