तुळजापूर नगर पालिकेचे मुख्याधिकारी तसेच इतर कर्मचार्यांच्या मालमत्तेची चौकशी करून रितसर गुन्हे दाखल करा....लहुजी शक्ती सेना
आजपासून जिल्हाभर"दररोज निवेदन आंदोलन"*
*"तुळजापूर नगर पालिकेचे मुख्याधिकारी तसेच इतर कर्मचार्यांच्या मालमत्तेची चौकशी करून रितसर गुन्हे दाखल होईपर्यंत आजपासून जिल्हाभर"दररोज निवेदन आंदोलन"*
तुळजापूर नगर पालिकेचे मुख्याधिकारी तसेच इतर कर्मचार्यांच्या मालमत्तेची चौकशी करून पात्र अनुकंपाधारकांना तात्काळ नौकरीत सामावून घ्यावे या प्रमुख मागण्यांसाठी आज उस्मानाबाद जिल्हाभरात "दररोज निवेदन" आंदोलनाच्या अनुषंगाने जिल्हाभरातील तहसील मार्फत मा. जिल्हाधिकारी यांना निवेदन पाठवण्यात आले.
त्याचाच एक भाग म्हणून आज लहुजी शक्ती सेना कळंब तालुक्याच्या वतीने तहसीलदार कळंब यांच्या मार्फत उस्मानाबाद जिल्हाधिकारी यांना सदर मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले यावेळी लहुजी शक्ती सेनेचे उस्मानाबाद जिल्हा कोअर कमेटी अध्यक्ष बालाजी गायकवाड, कळंब तालुका अध्यक्ष पांडुरंग कदम, तालुका प्रसिद्धी प्रमुख विकास गायकवाड, तालुका उपाध्यक्ष सुदेश शिंदे, शहर संघटक शंकर ताटे, अर्जुन सहाने, बबन गायकवाड, प्रभाकर आबा खंडागळे आदी उपस्थित होते.
प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा