*खातगुण येथील श्री. पिरसाहेब राजेबागसवार उरूस रद्द*
वडूज प्रतिनिधी / शरद कदम
खातगुण ता. खटाव येथील हिंदू - मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असलेल्या पीरसाहेब राजेबागसवार यांचा दि. ४ ते ७ एप्रिल या कालावधित साजरा होणारा उरूस रद्द करण्यात आला आहे, कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता शासनाच्या आदेशाचे पालन करत उरूस रद्द करण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला आहे.
उरूसाच्या अनुषंगाने उरूस यात्रा कमिटी व ग्रामपंचायत पदाधिकारी यांची पुसेगाव पोलिस ठाण्यात बैठक झाली. यावेळी सहायक पोलिस निरिक्षक चेतन मछले यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोनाच्या अनुषांगाने यात्रा, उत्सव याबाबत दिलेल्या सुचनाची माहिती दिली. यात्रा, उत्सवांवर बंदी असल्याने गावात दुकाने लागणार नाहीत. तसेच कोणत्याही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येवू नये, याची जबाबदारी ग्रामपंचायत तसेच यात्रा कमिटीची असून, शासनाच्या आदेशाचे पालन करावे असे आवाहन यावेळी त्यांनी केले.
यात्रा कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी भाविकांच्या दर्शनासाठी दर्गा दिनांक ४ ते ७ एप्रिल या कालावधीत बंद ठेवण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच कोरोनाच्या अनुषांगाने शासनाने दिलेल्या नियमाचे पालन करून धार्मिक विधी पार पाडण्यात येतील असे सांगितले आहे. या बैठकीला उपसरपंच यशवंत लावंड, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष तानाजी लावंड, सुनिल लावंड, संजय पवार व पदाधिकारी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा