Breaking

शुक्रवार, २६ मार्च, २०२१

खटावच्या रणरागिणी जिजाऊ पुरस्कारांनी सन्मानित*



*खटावच्या रणरागिणी जिजाऊ पुरस्कारांनी सन्मानित*
वडूज प्रतिनिधी / शरद कदम

        जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने ज्या महिलांनी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, वैद्यकीय क्षेत्रात व आपल्या कुटुंबातील जबाबदाऱ्या पार पाडून बचत गट ह्या माध्यमातुन लघुउदयोग करतात तसेच कलाक्षेत्र , क्रिडाक्षेत्र अशा वेगवेगळया क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या रणरागिनीपैकी खटाव तालुक्यातील भारतीय महाक्रांती सातारा जिल्हाध्यक्षा शारदा भस्मे , शिवबा संघटना खटाव तालुकाध्यक्षा सलमा डांगे, कार्याध्यक्षा सिमा सुर्यवंशी, सदस्या आशा जाधव, राष्ट्रवादी महिला आघाडी खटाव तालुकाध्यक्षा आशाताई बरकडे, सि. कुरोलीच्या माजी सरपंच राष्ट्रवादी महिला आघाडी जिल्हा सरचिटणीस प्रमिला पाटोळे यांना शिवबा संघटनेचा जिजाऊ विशेष गौरव पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. 
           सातारा येथील समर्थ मंदिराच्या दैवज्ञ हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत या सर्व रणरागिणींना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी पोलिस उपनिरक्षक राजेंद्र यादव , शिवबा संघटनेचे संस्थापक श्री जरांगे -पाटील , महिला आघाडी अध्यक्षा सविता शिंदे, जिल्हाध्यक्ष संदीप शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
           या पुरस्कार प्राप्त केलेल्या सर्व महिलांचे महाक्रांती राष्ट्रीय महिला अध्यक्षा जयश्री सावर्डेकर ( माई ), रुपाली शिंदे, वंदना बामणे, सायली उलवेकर, संदीप शिंदे, नेहा लोहार, मंगल शिंदे, अर्चना शेतोळे, मिना गगवडे, कोमल जांभळे, सपना सत्रे, वहीदा पठाण आदिसह मान्यवर व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा