Breaking

रविवार, २८ मार्च, २०२१

बीड शहरात मोकाट फिरणार्‍यांना पोलिसांचा प्रसाद



*बीड शहरात मोकाट फिरणार्‍यांना पोलिसांचा प्रसाद*
बीड जिल्हा प्रतिनिधी- नवनाथ आडे

गेल्या दोन दिवसांपासून बीड जिल्ह्यामध्ये लॉकडाऊन सुरू असताना काही नागरिक शहरात दुचाकीवरून फिरत आहेत. गेले दोन दिवस पोलीसांनी या नागरिकांना विचारपूस करून सोडून दिले.
मात्र पोलीस मारहाण करत नसल्याचे पाहून मोकाट फिरणार्‍यांची संख्या वाढत गेली. त्यामुळे आज सकाळी शहरातील खासबाग, छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि बशीरगंजमध्ये विना काम फिरणार्‍या नागरिकांना पोलीसानीं चांगलाच प्रसाद दिला.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी 25 मार्चपासून जिल्ह्यात 10 दिवसाचा लॉकडाऊन घोषीत केला आहे. 
लॉकडाऊनमध्ये नागरिकांच्या बाबतीत पोलीसांना संयमाची भूमिका घेण्याचा सल्ला या वेळी जिल्हाधिकर्‍यांनी दिला होता. 
मात्र पोलीसांच्या नरमाईचा गैरफायदा घेत शहरात काही मोकाट फिरणार्‍यांची संख्या वाढतच जात असल्यामुळे आज पोलीसांनी या मोकाट फिरणार्‍यांविरोधात सक्तीची भूमिका घेत त्यांना चांगलाच प्रसाद दिला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा