बीड जिल्ह्य़ातील वनविभागातील जळीतकांड प्रकरणात चौकशीचे आदेश:- डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
_____________________________
बीड जिल्ह्य़ातील वनविभागातील गैरव्यवहार प्रकरणात कारवाई होऊ नये यासाठीच वनविभागातील जळीतकांड प्रकरणात वाढ झाली असून याप्रकरणात डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर सामाजिक कार्यकर्ते तथा भ्रष्टाचार निर्मूलन समिती जिल्हाध्यक्ष बीड यांच्या तक्रारीनंतर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख)नागपुर कार्यालय यांनी मुख्य वनसंरक्षक प्रादेशिक औरंगाबाद यांना डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या तक्रारीवरून मुद्देनिहाय अनुषंगानेच नियमानुसार योग्य ती कारवाई करून 31 मार्च पर्यंत अहवाल कार्यालयास सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
सविस्तर माहीतीस्तव:-
______________________________ बीड जिल्ह्य़ातील जिल्हा नियोजन समितीतुन वनविभागातील विविध विकास कामासाठी दिलेल्या 10 कोटी 84 लाख रुपए गैरव्यवहार प्रकरणात डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर सामाजिक कार्यकर्ते तथा भ्रष्टाचार निर्मूलन समिती जिल्हाध्यक्ष बीड यांच्यासह सहका-यांनी लेखी तक्रारी, निवेदन, आंदोलनानंतर मंत्रालयातुन चौकशीचे आदेश आल्यानंतर वनविभागातील जिल्हाधिकारी यांनी त्रिसदस्यीय समिती नेमल्यानंतर बीड जिल्ह्य़ातील वनविभागात आग लागण्याच्या घटनात वाढ झालेली दिसुन येते, महिनाभरातच पाटोदा तालुक्यातील चुंबळी-मळेकरवाडी, नायगाव अभयारण्य, तर धारूर तालुक्यातील मोहखेड, तसेच मोठेवाडी ,कासारी, बीड तालुक्यातील मौजे, पिंपरनई येथिल सामाजिक वनीकरण विभागातील जळीत कांड त्यानंतर लगेचच मोहखेड ते आडस रोड वरील शिंगणपाटी जवळ उखळ्या द-याच्या माथ्यावरील डोंगरावर संशयास्पद आग लागून मोठ्याप्रमाणात वनविभागातील वृक्षलागवड, संगोपणसह, वन्यजीव प्राण्यांचा होरपळून मृत्यु झाला असून बीड जिल्ह्य़ातील वनविभागातील जळीत कांड प्रकरणात स्वतंत्र उच्च स्तरीय कमिटी मार्फत चौकशी करण्यात यावी यासाठी प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख)नागपुर कार्यालयात केलेल्या लेखी तक्रारीनंतर त्यांनी मुख्य वनसंरक्षक प्रादेशिक औरंगाबाद यांना धारूर तालुक्यातील मौजे मोहखेड ते आडस, मोठेवाडी, मौजे कासारी, व दि.23 मार्च रोजी धारूर तालुक्यातील मौजे मोहखेड ते आडस रोड वरील शिंगणवाडी पाटीजवळ उखळ द-याच्या माथ्यावरील डोंगरावरील तसेच मौजे पिंपरनई ता.जि.बीड येथील सामाजिक वनीकरण विभागातील जळीतकांड प्रकरणात डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगानेच मुद्देनिहाय चौकशी करून नियमानुसार कार्यवाही करून 31 मार्च 2021 पर्यत अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेले आहेत.
आंदोलनानंतर मंत्रालय महसुल व वनविभाग आणि नागपुर कार्यालयातुन चौकशीचे आदेश
डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर सामाजिक कार्यकर्ते तथा भ्रष्टाचार निर्मूलन समिती जिल्हाध्यक्ष बीड, शेख युनुस च-हाटकर भ्रष्टाचार निर्मूलन समिती तालुकाध्यक्ष बीड, शंकर भोसले, उदयनराजे युवक प्रतिष्ठान जिल्हाध्यक्ष बीड, विलास गवळी धारूरकर, सामाजिक कार्यकर्ते महंमद जुबेरखान,अशोक कातखडे शिरूर कासारकर यांनी वेळोवेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनानंतर महसुल व वनविभाग मंत्रालय तसेच प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबलप्रमुख)नागपुर कार्यालय यांनी मुख्य वनसंरक्षक प्रादेशिक औरंगाबाद यांना लेखक आदेश देऊन कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यामुळेच लवकरच या वनविभागातील जळीतकांड प्रकरणात उलगडा होईल व संबधितांवर दोषींवर कारवाई करण्यात येईल
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा