महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशन गेवराई तालुका अध्यक्ष बाबा वाघमारे यांच्या वतीने गेवराई पोलीस स्टेशन चे महिला उपनिरीक्षक अर्चना भोसले यांचा सत्कार
गेवराई:- गेवराई पोलीस स्टेशन चे महिला उपनिरीक्षक अर्चना भोसले यांनी आपल्या उपनिरीक्षक पदाचा पदभार स्विकारल्या नंतर महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशन चे गेवराई तालुका अध्यक्ष व युवकांमध्ये सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळख असणारे व सामान्य माणसाच्या अन्याय विरुद्ध लढणारे बाबा वाघमारे यांनी गेवराई पोलीस स्टेशन येथे जाऊन उपनिरीक्षक अर्चना भोसले यांचा शाल श्रीफळ व फुलाचा गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
गेवराई पोलीस ठाण्यात चोख कर्तव्य बजावत असलेल्या अर्चना भोसले यांचा सन्मान केल्याने आम्हाला खूप अभिमान वाटला असल्याचे यावेळी महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशन चे गेवराई तालुका अध्यक्ष बाबा वाघमारे यांनी सांगितले. महिला पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना ठाण्यात कसे दररोज आपले कर्तव्य कसे बजावे लागते हे सन्मानित निमित्ताने दिसून आले.. गेवराई शहरातील व ईतर ग्रामीण भागातील विविध महिलांना या नंतर योग्य न्याय महिला उपनिरीक्षक अर्चना भोसले यांच्या माध्यमातून मिळत राहिल. असे गेवराई तालुका अध्यक्ष बाबा वाघमारे यांनी सोबत असणाऱ्या कार्यकर्त्या व महिला उपनिरीक्षक भोसले यांच्या समोर देखील बोलवून दाखविले आहे. व उपनिरीक्षक भोसले यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.. त्यावेळी शहर अध्यक्ष शाम गायकवाड आदी उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा