*
*अखिल भारतीय वारकरी मंडळ बारामती तालुका अध्यक्षपदी मोहन भांडवलकर यांची नियुक्ती*
*माळशिरस प्रतिनिधी /भाग्यवंत ल.नायकुडे*
सोमेश्वर करंजे येथील मोहन मुरलीधर भांडवलकर यांची अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या बारामती तालुका कमिटी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
आखिल भारतीय वारकरी मंडळाचे संस्थापक आणि राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प. प्रकाश महाराज बोधले डिकसळकर ( राष्ट्रीय कीर्तनकार ) यांनी ही नियुक्ती घोषित करून नियुक्तीचे पत्र दिले. याप्रसंगी व्यासपीठावर मंडळाचे केंद्रीय कमिटी सदस्य ह .भ. प. शंकर महाराज शेवाळे, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ह.भ.प. अनिल महाराज वाळके, संत वांड्मय प्रचार, प्रसार कमिटी प्रदेश प्रमुख ह भ प आनंद महाराज तांबे, पुणे विभागीय अध्यक्ष ह भ प दत्तात्रय महाराज सोळसकर, पुणे विभागीय उपाध्यक्ष ह भ प दीपक महाराज खांदवे, सह अध्यक्ष ह भ प विजय महाराज पवार, प्रदेश संपर्कप्रमुख ह भ प विनोदशेठ महाळुंगकर, पुणे विभागीय प्रमुख ह भ प युवराज महाराज शिंदे, विभागीय कोषाध्यक्ष ह भ प भानुदास महाराज गुजर, पुणे जिल्हाध्यक्ष ह भ प सुखदेव महाराज ठाकर, संत विचार प्रबोधिनीचे संस्थापक अध्यक्ष ह भ प गणेश महाराज आवजी, बाल गोरक्षनाथ पर्णकुटीचे मठाधिपती ह भ प बापू महाराज गाडेकर, ह भ प फरांदे महाराज यांचेसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
मोहन मुरलीधर भांडवलकर हे श्रीक्षेत्र सोमेश्वर देवस्थान करंजे ( तालुका बारामती जिल्हा पुणे) या देवस्थानचे पुजारी असून ते या देवस्थानचा महिमा ॲडिओ व्हिडीओ कॅसेट, सीडी काढून तसेच भजन प्रवचन इत्यादी माध्यमातून प्रसारित करीत आहेत. भांडवलकर यांचा जनसंपर्क खूपच मोठा असल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा