जिजामाता कन्या प्रशालेची कु.गायत्री शिंदे चित्रकला स्पर्धेत राज्यात प्रथम ,
माळशिरस प्रतिनिधी/भाग्यवंत ल. नायकुडे
AJ 24 Taas News Maharashtra
जिजामाता कन्या प्रशालेची गायत्री वैभव शिंदे हिने स्वच्छ भारत कलाप्रतीयोगीतेत झालेल्या ऑन लाईन चित्रकला स्पर्धेत महाराष्ट्रात प्रथम स्थान मिळविले असून राष्ट्रीय स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे.,
स्वच्छ भारत कलाप्रतीयोगीतेत झालेल्या ऑन लाईन चित्रकला स्पर्धेत गायत्री वैभव शिंदे हिने ए (प्लस) ग्रेड मिळवत गोल्ड मेडल व प्रमाण पत्र मिळवले असून तिची देशपातळीवरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या वेळी तिने लहान मुलांनी ग्राम पातळीवर स्वच्छता अभियानात भाग घेऊन स्वच्छता करतानाचे चित्र रेखाटले आहे. तिला चित्रकला शिक्षिका माधुरी दशरथ भांगे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
तिचे संस्थेचे अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील,तसेच प्रशाला समिती सभापती सौ.सुलक्षणादेवी मोहिते पाटील संचालीका कु.स्वरूपाराणी मोहिते पाटील, संस्थेचे सचिव अभिजित रणवरे, सहसचिव हर्षवर्धन खराडे, प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ मंजुश्री जैन,सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी अभिनंदन केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा